कै. काशिराया पाटील सार्वजनिक वाचनालयातर्फे विविध गावांत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 19, 2026

कै. काशिराया पाटील सार्वजनिक वाचनालयातर्फे विविध गावांत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कै. काशिराया पाटील सार्वजनिक वाचनालयातर्फे विविध गावांत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- कै. काशिराया पाटील सार्वजनिक वाचनालय, पितापूर यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त पितापूर, हन्नूर, बोरेगाव, दर्शनाळ व अरळी या गावांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून राष्ट्रीय सण उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने विविध गावांतील शाळांमध्ये इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मराठी वक्तृत्व स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून विजेत्यांची निवड करण्यात आली. विजयी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह व बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.

तसेच पितापूर, हन्नूर व दर्शनाळ येथे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे चेअरमन संजय परमेश्वर घोडके, तिपण्णा हेगडे, समर्थ भरमशेट्टी, प्रविण हाताळे, रेशनसिद्ध तळवार, समीर मुल्ला, शिवानंद पाटील, मल्लिनाथ बंडगर, बडय्या स्वामी, शिवप्रभुराज घोडके, कालेखान चाचा, दयानंद सगट आदी उपस्थित होते.

वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विविध गावांतील विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages