अक्कलकोट शाखेला चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची सदिच्छा भेट
या भेटीनिमित्त अक्कलकोट तालुका शाखेतील पदाधिकारी, ज्येष्ठ नेते व शिक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत स्नेहमेळावा व मार्गदर्शनपर संवाद आयोजित करण्यात आला. यावेळी शाखेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच शाखेसमोरील अडचणी, सभासदांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.
यावेळी चेअरमन शिवाजी पाटील, व्हाईस चेअरमन गुलाबराव पाटील आणि सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद भरले यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या माध्यमातून सभासदांचा विश्वास अधिक दृढ करणे, पारदर्शक व सक्षम कारभार करणे आणि सभासदांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अक्कलकोट शाखेच्या सर्वांगीण विकासासाठी पदाधिकारी व सभासदांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. **“संस्थेची प्रगती ही सर्वांच्या सहकार्यानेच शक्य आहे; एकत्र येऊन सक्षम संस्था घडवूया,”** असा सकारात्मक संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमास तालुका शाखा संचालक अशोक पोमाजी, माजी केंद्रप्रमुख व संघटनेचे ज्येष्ठ नेते सुरेश शटगार, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष काळाप्पा सुतार, जिल्हा शिक्षक संघाचे कार्यकारी सचिव सतीश वाले, जिल्हा संघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण म्हेत्रे, तालुका संघाचे सरचिटणीस सतीश पाटील, चन्नपटले सर, बागवान सर तसेच तालुका शाखेचे चिटणीस मल्लिनाथ आळगी यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या सदिच्छा भेटीमुळे अक्कलकोट शाखेतील पदाधिकारी व सभासदांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी परस्पर सहकार्य, विश्वास आणि सकारात्मक संवाद अधिक बळकट होण्यास या स्नेहमेळाव्याची मदत होणार असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
.png)
No comments:
Post a Comment