शंकरराव मोहिते महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ.अजित गांधी हे उपस्थित होते.आपल्या मनोगतात त्यांनी, रक्तदानाचे महत्त्व विशद केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. शिवप्रसाद टिळेकर, डॉ. हनुमंत अवताडे, डॉ. विश्वनाथ आवड, डॉ. बाळासाहेब मुळीक,डॉ. सतीश देवकर, डॉ. जनार्दन परकाळे, डॉ.चंकेश्वर लोंढे,प्रा. दादासाहेब कोकाटे, डॉ. चंद्रशेखर ताटे देशमुख, प्रा.रविराज सोनवणे, ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय पाटील, डॉ.सविता सातपुते, डॉ.पल्लवी मिसाळ, डॉ. विजय शिंदे, प्रा.जी जी धायगुडे, प्रा. विनायक माने, प्रा. उत्तम वाघमोडे, प्रा. रणजीत लवटे, कार्यालयीन प्रबंधक राजेंद्र बामणे उपस्थित होते. या रक्तदान शिबिरामध्ये स्वयंसेवकाबरोबर प्राध्यापक प्राध्यापिका यांनीही सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्तात्रय मगर यांनी केले तर आभार डॉ. सज्जन पवार यांनी मानले व सूत्रसंचालन प्रा.स्मिता पाटील यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी परिश्रम घेतले.
.png)
No comments:
Post a Comment