लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जयंती निमित्त एबीएस ग्रुप च्या वतीने भव्य मिरवणूक
मोहोळ (कटूसत्य वृत्त) जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव’ अशी क्रांतीची घोषणा करणारे थोर साहित्यिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती उत्सवाची सांगता रविवारी मिरवणुकीने झाली. भीमशाहिरांची पहाडी आवाजातील गाणी, डीजेच्या तुफानी आवाजाने मिरणुकीत उत्साह संचारला. या मिरवणुकीचा शुभारंभ माजी जी.प सदस्य शहाजान शेख यांच्या हस्ते करण्यात आले. ही मिरवणूक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक येथून सुरुवात होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज बुधवार पेठ महबूबनगर आदर्श चौक गवत्या मारुती चौक या मार्गाने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकात येऊन सांगता झाली. या मिरवणुकीचे आयोजन उपनगराध्यक्ष दत्तात्रय खवळे यांच्या संकल्पनेतून एबीएस ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले होते
यावेळी उपस्थित माजी जी.प सदस्य शहाजान शेख, दलित स्वयंसेवक संघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप देवकुळे, नगरसेवक सतीश आप्पा काळे, मुस्ताक शेख, सुशील भैया क्षिरसागर, संतोष सुरवसे, आण्णा फरतडे कुंदन धोत्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी गणेश भालेराव (मामु), आबा कांबळे, आकाश राऊत, विजय लवटे साजन चौगुले, प्रशांत गायकवाड, आनंद गायकवाड, महादेव गायकवाड, आरिफ शेख संतोष कमाईटकर, दादाराव पाटोळे, तानाजी कसबे, नाना चव्हाण, राहुल वाघमारे, उमेश कांबळे, नागेश खवळे, सुमित आष्टूळ, भाऊ आष्टूळ, मसा आष्टूळ इत्यादी सह एबीएस ग्रुपच्या सदस्याने परिश्रम घेतले या मिरवणुकीमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रेमींनी सहभाग घेत आपला आनंद साजरा केला.

No comments:
Post a Comment