पीसीसीओई मध्ये शुक्रवारी आयईईई आयसीसीयूबीईए आंतरराष्ट्रीय परिषद
टेक फॉर गुड : बिल्डिंग अ बेटर डिजिटल वर्ल्ड’ यावर होणार मंथन
पिंपरी, पुणे (कटूसत्य वृत्त):- पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या वतीने दहावी आयईईई इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कम्प्युटिंग, कम्युनिकेशन, कंट्रोल अँड ऑटोमेशन या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी, (दि.२१) सकाळी १० वाजता, परिषदेचे उद्घाटन बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानीचे कुलगुरू डॉ. व्ही. रामगोपाल राव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्पेस एप्लीकेशन्स सेंटर, अहमदाबादचे माजी संचालक डॉ. निलेश देसाई, आयईईई पुणे सेक्शनचे प्रतिनिधी डॉ. मंदार भवाळकर आदी उपस्थित राहणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी आणि उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय परिषदेची ‘टेक फॉर गुड : बिल्डिंग अ बेटर डिजिटल वर्ल्ड’ ही मध्यवर्ती संकल्पना आहे. परिषदेला आयईईई पुणे सेक्शनचे तांत्रिक प्रायोजकत्व आहे. संशोधन निबंधांचे सादरीकरण, तज्ज्ञांची कीनोट व्याख्याने आणि ज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे. डॉ. अर्चना शर्मा आणि डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. उत्कृष्ट संशोधनासाठी ‘बेस्ट पेपर अवॉर्ड’ प्रदान करण्यात येणार आहे.
समारोप केंद्रीय मंत्रालय इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वरिष्ठ अधिकारी डॉ. सुधीर कुमार मारवा यांच्या उपस्थितीत होणार आहे.
पीसीसीओईच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या संशोधनाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, विद्यार्थी, संशोधक, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्याला चालना देणे तसेच भारताच्या संशोधन क्षमतेला जागतिक व्यासपीठाशी जोडणे, हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.


No comments:
Post a Comment