टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील १३ गुन्हेगारांसह करमाळा उपविभागातील १७ जण तडीपार; सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 19, 2026

टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील १३ गुन्हेगारांसह करमाळा उपविभागातील १७ जण तडीपार; सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

 टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील १३ गुन्हेगारांसह करमाळा उपविभागातील १७ जण तडीपार; सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-   सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत करमाळा उपविभागातील १७ सराईत गुन्हेगारांना तडीपार (हद्दपार) केले आहे. या कारवाईत टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल १३ गुन्हेगारांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणारे, दहशत माजविणारे आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली असल्याची चर्चा आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल व्ही. कुलकर्णी यांनी शरीराविरुद्धचे गुन्हे, वाळू तस्करी, अवैध धंदे तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्यांविरोधात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा, टेंभुर्णी आणि कुर्डुवाडी पोलीस ठाण्यांनी सराईत गुन्हेगारांची यादी तयार करून हद्दपारीचे प्रस्ताव सादर केले. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी, माढा विभाग, कुर्डुवाडी यांनी १७ जणांना तडीपार करण्याचे आदेश दिले.
टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील सर्वाधिक १३ जण तडीपार
या कारवाईत करमाळा पोलीस ठाण्यातील २, कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातील १ आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल १३ आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे टेंभुर्णी परिसरातील गुन्हेगारीवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत आहे.
करमाळा पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार करण्यात आले ची पुढील नांवे 
1)जयवर्धन उर्फ मुन्ना हणुमंत नैन (वांगी) ता करमाळा 
2)करण कृष्णा आलाट (मौलाली माळ, करमाळा)
3)ओंकार दत्तात्रय गव्हाणे, कुर्डूवाडी 4)हणुमंत बापू महाडिक मुंगशी,
 तर
टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार करण्यात आले ची नावे 1)नागेश शंकर लोंढे (टेंभुर्णी)
2)मारुती जनार्दन केचे (आलेगाव बु.) ता माढा 
3)आगतराव लक्ष्मण काळे (अकोले बु.) ता माढा 
4)धीरज अशोक जाधव (मोडनिंब) ता माढा 
5)बप्पा उर्फ शिवानंद मेघराज भोसले (बेंबळे) ता माढा 
6)महेश उत्तरेश्वर गायकवाड (शेवरे) ता माढा 
7)संजय हरिदास दरगुडे ता माढा (चौभेपिंपरी) ता माढा 
8)अजित नवनाथ पाटोळे (शेवरे) ता माढा 
9)विकास रमेश काळे (चौभेपिंपरी) ता माढा 
10)समाधान कल्याण जरक (टाकळी टें) ता माढा 
11)रत्नमाला आगतराव काळे (अकोले बु.) ता माढा 
12)विमल आगतराव काळे (अकोले बु.) ता माढा 
13)चेतन अण्णा काळे (बेंबळे) ता माढा 
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, सराईत गुन्हेगार, वाळू तस्कर, अवैध धंदे करणारे तसेच समाजात दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर प्रतिबंधात्मक कारवाया सातत्याने सुरू राहतील.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल व्ही. कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा, टेंभुर्णी आणि कुर्डुवाडी पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली.
 "चौकट "
" कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईची अपेक्षा"

टेंभुर्णी परिसरात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या काही घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. टेंभुर्णी परिसरात वाळू तस्करीशी संबंधित वादातून एका वकिलावर गंभीर हल्ला झाल्याची घटना यापूर्वी घडली होती. तसेच टेंभुर्णीतील एका पत्रकाराला अवैध धंद्यांशी संबंधित व्यक्तीकडून नुकतीच धमकी दिल्याची माहिती समोर आली होती. या दोन्ही घटनांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण केली.
पत्रकार, वकील आणि कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांवर दबाव आणण्याचा किंवा धमकावण्याचा कोणताही प्रयत्न हा लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक मानला जातो. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर सातत्याने अंकुश ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages