माढ्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या इशारा सभेची तयारी पुर्ण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 8, 2026

माढ्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या इशारा सभेची तयारी पुर्ण

 माढ्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या इशारा सभेची तयारी पुर्ण 





माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या शनिवारी दि.८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या इशारा सभेची तयारी पुर्ण झाली असून या निर्णायक आणी क्रांतीकारी सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठा समन्वयक माऊली पवार यांनी सकल मराठा समाजाला केले.

२९ ऑगस्टला मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसणार आहेत.

या उपोषण आंदोलनाच्या पार्शभुमीवर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे.त्याचाच भाग म्हणून आज  शनिवारी दुपारी ३ वाजता माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील भव्य प्रांगणावर इशारा सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेची तयारीचा आढावा घेण्यासाठी सोलापूर जिल्हातील मराठा समन्वयकांनी सभा स्थळाची पाहणी केली.
सोलापूर जिल्हात ६० हजारांहून अधिक बांधवानी कुणबी प्रमाणपत्र काढली आहेत. ज्या व्यक्तिमुळे समाजाला कुणबी  प्रमाणपत्राचा दाखला मिळाला.ते बांधव अजूनही आरक्षणाच्या लढ्यापासून अलिप्तच आहेत. अश्या मंडळीनी आता घराबाहेर पडण्याची गरज आहे.

समाजाला अखेरचा महत्वकांक्षी न्याय मिळवून घेण्यासाठी अखेरच्या लढ्यासाठी कुटूंबासमवेत आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

चौकट-
मनोज जरांगे पाटील हे वैराग मार्गे माढा शहरात येतील.ते येताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचा क्रेनद्वारे हार घालून पुष्पवृष्टी करण्यात येईल. त्यानंतर सभा स्थळी जाऊन संबोधित करणार आहेत.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages