खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक सेंटरचे उद्घाटन
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज आणि परिसरातील नागरिकांसाठी एक अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे, ग्रामीण भागात प्रथमच सर्वसमावेशक ॲस्थेटिक केअर सेंटर सुरू झाले आहे. 'नाव्या लेझर, कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी आणि प्लास्टिक सर्जरी युनिट' तसेच 'ॲपेक्स ओबेसिटी क्लिनिक' या अद्ययावत वैद्यकीय सुविधांचा भव्य दुहेरी उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी खासदार मा. श्री. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना डॉ. रेवती राणे म्हणाल्या की, "सौंदर्य व स्वतःची काळजी (सेल्फ-केअर) घेणे हे आता केवळ मोठ्या शहरांतील किंवा फक्त उच्चभ्रू लोकांसाठी सीमित नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना आणि विशेषतः महिलांना प्रसूतीनंतर किंवा रजोनिवृत्तीच्या काळात येणाऱ्या अनेक शारीरिक समस्यांवर आता अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक उपचार अकलूजमध्येच पुणे मुंबई च्या मानाने अत्यंत कमी खर्चात आपल्या अकलूज मध्ये उपलब्ध झाले आहेत."
या अत्याधुनिक सेंटरमध्ये (१०० फूट बायपास रोड, ॲपेक्स हॉस्पिटल, अकलूज) खालील महत्त्वाच्या व विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध असणार आहेत:
लेझर कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी: महिलांच्या खाजगी समस्या, योनीमार्गाचा सैलपणा/कोरडेपणा आणि मेनोपॉजच्या समस्यांवर प्रगत लेझर उपचार.
HIFEM तंत्रज्ञान (इलेक्ट्रोमॅग्नेटिक चेअर): शस्त्रक्रियेशिवाय केवळ बसल्या जागी पेल्विक स्नायूंना बळकटी देणारे आणि हसताना/खोकताना होणाऱ्या 'मूत्र गळती'वर (SUI) प्रभावी उपाय करणारे आधुनिक मशीन.
त्वचारोग व सौंदर्य उपचार: लेझर हेअर रिमूव्हल, अँटी-एजिंग (बोटॉक्स/फिलर्स), हायड्राफेशियल आणि केस गळतीवर PRP ट्रीटमेंट.
प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी: हेअर ट्रान्सप्लांट, लिपोसक्शन (अतिरिक्त चरबी काढणे), टमी टक, आणि स्तनांच्या व चेहऱ्याच्या (नाकाचा आकार सुधारणे इ.) सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया.
आधुनिक लेझर शस्त्रक्रिया: मूळव्याध, भगंदर (फिस्टुला), पिलोनिडल सायनस आणि व्हेरिकोज व्हेन्स (फुगलेल्या शिरा) यांवर विनाटाका लेझर उपचार.
ओबेसिटी (लठ्ठपणा) क्लिनिक: वाढत्या वजनावर आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी 'ॲपेक्स ओबेसिटी क्लिनिक'मध्ये विशेष उपचार.
या प्रकल्पासाठी ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सतीश दोशी , डॉ. विनोद शेटे (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. रेवती राणे (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. विक्रमसिंह गायकवाड (स्त्रीरोगतज्ज्ञ),डॉ. रोहित फडे (सर्जन), डॉ. तेजस्विता राऊत (त्वचारोग तज्ज्ञ) आणि डॉ. नितीन राणे ( संचालक, ॲपेक्स ओबेसिटी) यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची संपूर्ण टीम आता रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. शिवाय येथे सर्व प्लास्टिक सर्जरी आणि त्यासंबंधित उपचारांसाठी मिरज येथील सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. अक्षय कुलकर्णी हे कन्सल्टंट म्हणून उपलब्ध असतील.
कार्यक्रमास , हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार ,ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव राणे , डॉ विद्युत शहा , आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ संजय सिद, होमिओपॅथी संघटनांचे अध्यक्ष डॉ अभिजीत राजेभोसले , वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर डॉक्टर, पत्रकार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment