दहिगांव येथील जैन मंदिरात घडलेल्या चोरीच्या घटने संदर्भात संस्कृती सातपुते यांची भेट
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- दहिगाव ता. माळशिरस येथील प्रसिद्ध दिगंबर जैन मंदिरात बुधवार दि.५ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते गुरुवारी सकाळी ६ वा.दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदिरातून चांदीच्या मूर्ती, चरणपादुका, सोन्याचा मुलामा दिलेला कलश आणि ४० हजार रोख रक्कम असा एकूण ८ लाख ९१ हजारा पेक्षा जास्त रुपयांची चोरी झाली होती त्याबाबत नातेपुते पोलीस ठाणे येथे चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मतदार संघात चोरी झाल्याची बातमी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांना समजली असता. त्यांनी दहिगाव ता. माळशिरस येथील प्रसिद्ध दिगंबर जैन मंदिरात घडलेल्या चोरीच्या घटने संदर्भात भेट देऊन चोरी संदर्भात चौकशी करून तेथील पाहणी केली तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर करण्यात यावा या संदर्भात योग्य त्या सूचना सभापती संस्कृती सातपुते यांनी दिल्या. यावेळी बाहुबली चंकेश्वरा, शितल गांधी,पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकटीत :
चोरट्याने मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीलगत असलेल्या पाइपच्या साहाय्याने भिंतीवर चढून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्यातील कपाटाचे कुलूप तोडून पार्श्वनाथ स्वामी आणि अनंतनाथ यांच्या चांदीच्या मूर्ती, चांदीच्या चरणपादुका तसेच सोन्याचा मुलामा दिलेला लहान कलश चोरून नेला. याशिवाय मंदिरातील दोन दानपेट्या फोडून त्यातील सुमारे ४० हजार रुपयांची रोख रक्कमही लंपास करण्यात आली.

No comments:
Post a Comment