एक सप्टेंबरला माढ्यात परतणार बबनराव शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 10, 2026

एक सप्टेंबरला माढ्यात परतणार बबनराव शिंदे

 एक सप्टेंबरला माढ्यात परतणार बबनराव शिंदे

अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य स्वागत; रक्तदान, कुस्ती, बैलगाडा शर्यतीसह ११ सामाजिक उपक्रमांचे आयोजन



कन्हेरगाव (कटूसत्य वृत्त) : माढा तालुक्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर अमेरिकेतील सेंट लुईस येथील रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते येत्या १ सप्टेंबर रोजी आपल्या जन्मगावी निमगाव (टें.) येथे परतणार आहेत. विशेष म्हणजे याच दिवशी त्यांचा ७५वा अमृतमहोत्सवी वाढदिवस असल्याने त्यांच्या स्वागतासह विविध सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

या नियोजनासाठी श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील श्री दत्त मंदिरात माढा तालुका व मतदारसंघातील शिंदे बंधूंच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयमामा शिंदे होते.

यावेळी माजी आमदार विनायकराव पाटील, माजी सभापती विक्रमसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे, सदस्य आदिनाथ देशमुख, वामनराव माने, बाळासाहेब माळी, योगेश दळवी, मुन्ना मोरे, भाजपचे अध्यक्ष योगेश बोबडे, दिलीपराव भोसले, योगेश पाटील, अप्पासाहेब उबाळे, नागेश खटके-पाटील, पोपटराव गायकवाड, असलम काझी, अण्णासाहेब ढाणे, पंचायत समिती सदस्य संभाजी पाटील, रमेश पाटील, शंभूराजे मोरे, दीपक पाटील, प्राचार्य महेंद्र कदम आदी उपस्थित होते.

याशिवाय भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील, बाबाराजे बोबडे, अशोक लुणावत, माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, कुस्ती सम्राट अस्लम काझी, प्रा. जी. के. देशमुख यांच्यासह मार्केट कमिटीचे संचालक आणि विविध क्षेत्रांतील पदाधिकारी उपस्थित होते.

वैद्यकीय सल्ल्यानुसार बबनराव शिंदे आता भारतात परतत असून, सव्वा वर्षाच्या कालावधीनंतर त्यांचे माढा तालुक्यात आगमन होत असल्याने गावागावातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करावी, असे आवाहन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केले.

अमृतमहोत्सवानिमित्त ११ उपक्रम

बबनराव शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षसंवर्धन व पर्यावरणविषयक उपक्रम, युवा महोत्सव, कीर्तन महोत्सव, बैलगाडा शर्यत, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, आरोग्य शिबिर यांसह एकूण ११ उपक्रमांचा समावेश आहे.

भीमानगरपासून भव्य स्वागत

१ सप्टेंबर रोजी बबनराव शिंदे यांचे माढा तालुक्याच्या सीमेवर भीमानगर येथे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते टेंभुर्णी येथे येऊन श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडे रवाना होणार आहेत.

त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी त्यांच्या पाच वेगवेगळ्या तुला करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बबनराव शिंदे यांच्या आगमनामुळे माढा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या स्वागताची तयारी गावागावात सुरू झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages