सर्वसामान्यांसाठी सनराईज क्लबचे नेत्र शिबिर प्रेरणादायी : ना. राजन पाटील
डोळे तपासणी व उपचार शिबिरात २३९ जणांचा सहभाग; माजी आमदार यशवंत माने यांची उपस्थिती
मोहोळ (कटूसत्य वृत्त) : महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त सर्वसामान्यांना दिलासा देणारे सामाजिक उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. मानवी शरीरातील डोळे हा अत्यंत महत्त्वाचा अवयव असून, सनराईज क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेले डोळे तपासणी व उपचार शिबिर, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नवीन एनसीएमसी कार्ड शिबिर तसेच प्रधानमंत्री आवास योजना अर्ज शिबिर हे उपक्रम प्रेरणादायी आहेत. जिल्ह्यातील अन्य मंडळांनीही या कार्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन राज्य सरकार परिषदेचे अध्यक्ष ना. राजन पाटील यांनी केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ शहरात सोमवार, ८ ऑगस्ट रोजी नगरसेवक मुस्ताक शेख, राणी उपचार व उपनगराध्यक्ष दत्तात्रय खवळे यांच्या संकल्पनेतून सनराईज क्लबच्या वतीने नेत्र तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. राजन पाटील बोलत होते.
या शिबिरात २३९ नागरिकांनी सहभाग घेत नेत्र तपासणी करून घेतली. नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगरसेवक मुस्ताक शेख यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
माजी आमदार यशवंत माने यांनी उपनगराध्यक्ष दत्तात्रय खवळे आणि नगरसेवक मुस्ताक शेख यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष दत्तात्रय खवळे, गटनेते सतीश काळे, बापू डोके, सुशील भैया क्षीरसागर, विक्रम फडतरे, संतोष सुरवसे, शहनाज तलफदार, शाहिस्ता परवीन, मुस्ताक शेख, राजू सुतार, वैभव गुंड, राजाराम वाघमारे, चंद्रकांत देवकते, डॉ. वसीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाफिज सादिक इनामदार, समीर शेख, फरिद ईनामदार, आरिफ शेख, इरफान शेख, आसिफ शेख, रवी डोकडे, उमेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment