जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाला जिल्हा युवा पुरस्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 17, 2026

जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाला जिल्हा युवा पुरस्कार

 जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाला जिल्हा युवा पुरस्कार




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यातील युवक व युवकांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, कोंडी या संस्थेला संस्था प्रवर्गातून जिल्हा युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष गणेश निळ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महापालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश मोहारे, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी आदी मान्यवर उपस्थित होते.

जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाने सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण व आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रम राबविले आहेत. संस्थेच्या वतीने आरोग्य शिबिरे आयोजित करून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी नामवंत व्याख्यात्यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवून युवकांना क्रीडेकडे वळविण्याचे कार्य संस्थेने केले आहे.

ग्रामीण भागातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष गणेश निळ यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

यावेळी संस्थेच्या प्राचार्या सुषमा निळ, दामोधर निळ, क्रीडा अधिकारी नदीम शेख, राहुल गायकवाड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages