जम्मू येथे कर्तव्य बजावताना मंगळवेढ्याचे जवान वैभव आवताडे यांना वीरमरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 17, 2026

जम्मू येथे कर्तव्य बजावताना मंगळवेढ्याचे जवान वैभव आवताडे यांना वीरमरण

 जम्मू येथे कर्तव्य बजावताना मंगळवेढ्याचे जवान वैभव आवताडे यांना वीरमरण



मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील जवान वैभव तात्यासाहेब आवताडे (वय - 31) यांना वीरमरण आले. हिंदुस्थानी लष्कराच्या मराठा सिग्नल रेजिमेंटमध्ये ते कार्यरत होते.

त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती शुक्रवारी दुपारी कुटुंबीयांना मिळताच गणेशवाडीसह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत वैभव आवताडे 11 वर्षांपूर्वी हिंदुस्थानी लष्करात भरती झाले होते. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी नेहमीच आपल्या कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. जम्मू येथील आव्हानात्मक वातावरणात सेवा बजावत असताना त्यांना सर्वोच्च बलिदान द्यावे लागले.

काही दिवसांपूर्वीच सुट्टी संपवून ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते. 13 ऑगस्टच्या रात्री सुमारे 11 वाजता त्यांनी पत्नी, आई आणि वडिलांशी फोनवर संवाद साधला होता. कुटुंबीयांची आपुलकीने चौकशी करणारा हा संवाद त्यांचा शेवटचा ठरेल, याची कल्पनाही त्यावेळी कोणी केली नव्हती.

वीर जवान वैभव आवताडे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, भाऊ, पत्नी दिपाली, 3 वर्षांची मुलगी देवांशी आणि 1 वर्षाचा मुलगा देवांश असा परिवार आहे. अवघ्या सहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या अकाली जाण्याने दोन्ही चिमुकल्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages