ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 17, 2026

ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

 ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, सोलापूर यांच्या वतीने देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी वाचनालय परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमास वाचनालयाचे अध्यक्ष तथा ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, सौ. छाया मोरे, लिपिक सारिका मोरे, चंद्रशेखर साठे, उद्धव सुपाते, प्रभाकर फुलमाळी, एस. एल. शेख, आर. जी. लव्हराळे, तेजुसिंग चव्हाण, अर्जुन व्हटे, श्रीशैल वास्ते, शिवकांता वास्ते, रुद्र वास्ते यांच्यासह वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. संविधान, लोकशाही आणि देशाच्या एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित करत वाचन संस्कृतीच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याबरोबरच सामाजिक आणि राष्ट्रीय जाणीव वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages