जवान वैभव आवताडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 18, 2026

जवान वैभव आवताडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 जवान वैभव आवताडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार







 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील लान्स नायक वैभव तात्यासो आवताडे यांच्यावर रविवार दि. 16 ऑगस्ट रोजी मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सेवारत सैनिक नंबर 15735441N लान्स नायक आवताडे वैभव तात्यासो हे हेडक्वार्टर 15 ओ पी सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. 14 ऑगस्ट 2026 रोजी कर्तव्यावर असताना गनशॉट वांड अपघात त्यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आज सकाळी 09.00 वाजता मूळ गावी गणेशवाडी, ता. मंगळवेढा येथे आणण्यात आले.

जवानाच्या पार्थिवावर पोलीस दलाच्या तुकडीने शोकसलामी दिली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल मिलिंद तुंगार, तहसीलदार मदन जाधव, पंचायत समिती सभापती दिपाली ताड, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, जिल्हा सैनिक कार्यालयाचे अप्पासाहेब कोडाग, पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रणिती भालके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशसेवेत प्राण अर्पण केलेल्या जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव हळहळले. जवान आवताडे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages