बबनरावजी शिंदे विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 20, 2026

बबनरावजी शिंदे विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

 बबनरावजी शिंदे विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- शनिवार दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी अकोले खुर्द येथील मा बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्य विद्यालयात ८०वा भारतीय स्वातंत्र्यदिन व ७९ वा वर्धापन दिन 'सोजरताई बुहुउद्देशीय विकास मंडळ निमगाव (टें ) या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा करमाळा - माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते ध्वजारोहण होऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अकोले खुर्द गावचे सरपंच प्रतिनिधी कांतिलालनाना नवले, दिपक मामा पाटील, रामभाऊ पाटील, हरिआप्पा पाटील,  नानासाहेब नवले , संतोष आण्णा पाटील, माजी सरपंच महादेव घाडगे, बिभीषण चिंतामण, पंचायत समिती सदस्य संभाजी पाटील , विनोद पाटील, पत्रकार धनंजय मोरे, अनिल तोडकर ,अशोक पाटील, कुबेर महाडिक, किसन घाडगे, अरुण पाटील ,सतीश लिंगे , तानाजी जगताप इत्यादी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व कै विठ्ठलराव भाऊ शिंदे यांचे प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन संपन्न झाले.
८० भारतीय स्वातंत्र्य दिनी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात स्वागत सकलजनांचे या गीताचे गायन तसेच "ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख में भरलो पाणी जो शहीद हुये है उनकी, जरा याद करो कुर्बानी. " हे देशभक्तीपर गीत कु गौरी विजय कांबळे हिने मंजुळ गीतगायन करून स्वागत तसेच स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलिदान देऊन शहीद झालेल्यांसाठी भावनिक वातावरण निर्माण केल्यामुळे विद्यार्थी व उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले .
 वंदेमातरम या राष्ट्रीय गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शासनाच्या परिपत्रकानुसार कार्यक्रमाची सुरुवात वंदेमातरम गीताने होऊन इयत्ता १०वीचे शिवराज बावळे सह ३२ विद्यार्थ्यांनी परेड संचलन करून प्रशालेत भारतीय सैनिक माहोल निर्माण केला. 
विद्यार्थ्यांनी कवायत विद्यार्थी जगताप याच्या हार्मोनियमच्या साथीने बैठे ५ व खडे ५  प्रकार गीत और मार्चिंग के साथ न चुकता शिस्तीमध्ये सादरीकरण केल्यामुळे उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. 
आपल्या प्रास्ताविकातून प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे सरांनी शाळेच्या गुणवत्तेसह भौतिक सुविधात्मक प्रगतीच्या चढत्या आलेखाचा आढावा घेताना वाढत्या विद्यार्थ्यांनुसार वर्गतुकड्या उपलब्ध करून देत असताना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकही उपलब्ध करून देत असल्याचे सांगत बसपरिवहन विभाग व प्रशालेतील जेष्ठ शिक्षक श्री संभाजी अनपट सर यांचेकडे स्पेशल नियोजन देऊन त्याचे व्यवस्थापन तसेच२४ बस व तालुका तसेच तालुक्या बाहेरचेही विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी कोठून येतात ते सर्व स्कूलबसचे रूट व त्याची व्यवस्था सांगितली. तसेच पोषण आहार व त्याची उत्तम व्यवस्था, प्रशालेचा १० वी १२ वी बोर्ड चा सर्वोत्कृष्ट निकाल सांगत येणाऱ्या पुढील शैक्षणिक वर्षात उत्तम विद्यार्थी समृद्ध ग्रंथालय, आर्टस व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी ड्रॅगन बोट स्पर्धा हा नवीन खेळ प्रकार उपलब्ध करण्याचा मानस व्यक्त केला व प्रशालेची सुरुवातीची स्थिती व सद्याची वस्तुस्थिती संस्थेचे अध्यक्ष मा संजयमामा यांचे समोर मांडून येणाऱ्या पुढील शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाताना सर्व सहकारी शिक्षक तसेच ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून मा संजय मामांचे शैक्षणिक विचार त्यांच्याच प्रेरणेतून मूर्तरूपात येत असल्याचे सांगितले . 
  ९ जून १९९७ रोजी लावलेलं प्रशालेचं रोपटं आज  ८० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनी वटवृक्षात रूपांतर झाल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  दीपक मामा पाटील यांनी सांगताना पुढे ते मामांना शाळेची पूर्वीची आठवण सांगताना म्हणाले की , "पुढील शिक्षणाची व्यवस्था या गावात नसल्यामुळे आम्ही टेंभुर्णी व इतर ठिकाणी जायचो परंतु आज या ठिकाणी तालुक्याच्या बाहेरून विद्यार्थी शिकण्यासाठी येत आहेत त्यामुळे गावाचा नाव लौकिक वाढला याचा सर्व ग्रामस्थांना अभिमान आहे . "
प्रशालेने माता किंवा पिता पालक नसणाऱ्या गुणवंत १०० विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देण्यासाठी मा. संजयमामांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ३ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले .
सत्कार समारंभ प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विश्वकोश स्पर्धेत राज्यस्तरीय क्रमांक पटकावणाऱ्या व मुंबई येथे मुख्यमंत्री यांचे हस्ते सत्कार होणार असलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, शिक्षिका यांचेसह विविध स्कॉलरशिप, ए टी एस , मंथन, एन एम एम एस, १० वी, १२ वी, MHT-CET परीक्षेत तसेच स्पर्धेत  ज्यांनी प्रावीण्य मिळवले अशा जवळपास ८० विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे गुणवंत मार्गदर्शक शिक्षक स्कॉलरशिप , ATS , मंथन , आय ॲम विनर इत्यादीसाठी धनुसिंग रजपूत व NMMS मार्गदर्शक विजयकुमार साखरे  तसेच उत्कृष्ट गीत गायना बद्दल कु गौरी कांबळे हिचा सत्कार तसेच
 भारत मातेची उत्कृष्ट रांगोळी रेखाटल्या बद्दल 9 वी मधील विद्यार्थिनी कु आदिती साळुंके 
इत्यादींचे  सत्कार संजयमामा शिंदे यांचे हस्ते तसेच विद्यार्थी व त्यांच्या पालका समवेत गुणवंतांचे सत्कार करण्यात आले .
अध्यक्षीय मनोगतातून संस्थेचे अध्यक्ष मा संजयमामा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सर्व प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व प्रशालेच्या गुणवत्तापूर्ण व उपक्रमशीलतेबद्दल अभिनंदन केले . प्रशालेच्या स्थापनेची आठवण सांगताना कै . बबनबापू पाटील यांनी अकोले ( खुर्द ) येथे शाळा स्थापनेसाठीचा आग्रह केल्याचा प्रसंग सांगत स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रशालेचा प्रगतीचा आलेख व विद्यार्थी संख्या पाहता इतर शहरी ठिकाणी व्यवसाय म्हणून शिक्षणाकडे पाहणाऱ्या शाळां कॉलेज मधील पटसंख्या कमी होत असल्याची तसेच शाळांतील विद्यार्थी उपस्थिती कमी होत असल्याची तसेच देशपातळीवर महत्त्वाच्या परीक्षा पेपर फुटी बाबत खंत व्यक्त केली . अकोले खुर्द येथील प्रशालेचा गुणवत्तेचा वाढता आलेख पाहता याचे श्रेय प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे व त्यांचे सहकारी शिक्षक यांचे योगदान असल्याचे तसेच शाळेचे नाव व गुणवत्ता टिकवून ठेवल्याचा मला अभिमान असल्याचे सांगत 
" ९ जून १९९७ रोजी लावलेल्या शाळेचे ठोंबरे सरांनी वटवृक्षात रूपांतर केले , व त्यांचे सहकारी शिक्षक तसेचअकोले ( खुर्द ) येथील ग्रामस्थांनीही सहकार्य केले . "
असे प्रतिपादन अध्यक्षीय मनोगतातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी केले .
कार्यक्रमाची सांगता करताना उपस्थित सर्व विद्यार्थी , शिक्षक , सर्व मान्यवर यांनी पसायदान म्हटले .
प्रशालेतील सर्व  प्राथमिक , माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी नियोजनासाठी परिश्रम घेतले .
 मा बबनरावजी शिंदे माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे यांचे सूचनेनुसार, स रा मोरे विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ मधुरा सुरवसे मॅडम तसेच मनोरमा ज्ञानदीप प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री रजपुत मॅडम, यशवंत प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना नेवसे मॅडम इत्यादींनी  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन व परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी अकोले (खुर्द) येथील तसेच पंचक्रोशीतून प्रतिष्ठित नागरिक ,विद्यार्थी पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 क्रीडाशिक्षक कार्यनियोजन विजयकुमार माने, जोतिराम श्रीराम आणि लोंढे यांनी पाहिले यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस .बी कोळी यांनी तर सत्कार समारंभ कार्यक्रम व आभार पी. एस. बिराजदार सर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages