डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालयात राहुरी कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांची सदिच्छा भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 20, 2026

डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालयात राहुरी कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांची सदिच्छा भेट

 डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालयात राहुरी कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांची सदिच्छा भेट


बार्शी (कटूसत्य वृत्त):- कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय, बार्शी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील नामवंत शास्त्रज्ञ व प्राध्यापकांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, रोजगार व करिअरच्या संधी याविषयी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमास कृषीविद्या विभागाचे प्राध्यापक व सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे नोडल ऑफिसर डॉ. यू. एस. सुर्वे, कनिष्ठ मृद शास्त्रज्ञ डॉ. इक्बाल बागवान व कृषी अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. एस. एस. कावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शन करताना डॉ. सुर्वे यांनी अचूक शेती, ड्रोन तंत्रज्ञान, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, मूल्यवर्धन तसेच MPSC, ICAR व IBPS-AFO यांसारख्या स्पर्धा परीक्षांमधील संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यानंतर मान्यवरांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रक्षेत्रास भेट देऊन विविध पिकांची प्रात्यक्षिके, आधुनिक जलव्यवस्थापन व फळबागेची पाहणी केली. महाविद्यालयातील शैक्षणिक व प्रक्षेत्रावरील उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. डी. जाधव, सर्व विभागांचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages