अक्कलकोटमध्ये नांदी ग्रंथपाल साहित्य संमेलनाची जय्यत तयारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 24, 2026

अक्कलकोटमध्ये नांदी ग्रंथपाल साहित्य संमेलनाची जय्यत तयारी

 अक्कलकोटमध्ये नांदी ग्रंथपाल साहित्य संमेलनाची जय्यत तयारी


अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- ग्रंथपाल हा प्रामाणिक व गरीब असून तो साहित्याची पुस्तके ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचकांना देतो. तो खराखुरा साहित्याचा पाईक आहे असे प्रतिपादन ग्रंथमित्र दत्तात्रय बाबर यांनी केले. 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत पुणे येथे होणार आहे. या साहित्य संमेलना प्रित्यर्थ सर्वत्र 99 नांदी साहित्य संमेलन होणार आहेत. त्यापैकी अक्कलकोट येथे मंगळवार 25 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या ग्रंथपाल साहित्य संमेलना निमित्त श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयाच्या सभागृहात अक्कलकोट तालुक्यातील ग्रंथपालांची बैठक घेण्यात आली त्यावेळी बाबर बोलत होते.
                साहित्य चळवळ व वाचन चळवळ या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. अक्कलकोट तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त ग्रंथालये आहेत. 100 व्या साहित्य संमेलनात जास्तीत जास्त ग्रंथपालांनी सहभागी व्हावे व ग्रंथालयांच्या माध्यमातून नांदी ग्रंथपाल साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी, नागरिक, साहित्य प्रेमी व समाजात जनजागृती करावी असे म.सा.प. च्या अध्यक्षा सौ. शैलशिल्पा जाधव यांनी सांगितले. याप्रसंगी सुभाष सुरवसे, चंद्रकांत पोतदार, बिराप्पा पुजारी, कुंडलिक पांढरे, महादेव कोटमाळे, प्रताप पाटील, हरिदास माने, पांडुरंग इंगळे, सातलिंगप्पा हौदे, बी एस पाटील, अमृतराव पाटील, नरसिंह जंगाले, पडसलगी, दत्तात्रय खांडेकर, अण्णापा बिराजदार, सुरवसे, विजय काळे, स्नेहा नराके आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages