शिखर पहारिया फाउंडेशनतर्फे 3 डिजिटल टीव्हीची भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 18, 2026

शिखर पहारिया फाउंडेशनतर्फे 3 डिजिटल टीव्हीची भेट

 शिखर पहारिया फाउंडेशनतर्फे 3 डिजिटल टीव्हीची भेट




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मागास समाजसेवा मंडळ संचलित जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व ज्युनिअर कॉलेज, सोलापूर येथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने 3 डिजिटल टीव्हीची भेट देण्यात आली.
           या डिजिटल सुविधांचे उद्घाटन फाउंडेशनचे कार्यकर्ते राज सलगर, धर्मराज गुंडे, आसिफ चौधरी, तनवीर शेख, तुषार जोगधनकर ,कौशल शिंदे व फुरकान मनियार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडिओ, चित्रे, नकाशे, ॲनिमेशन तसेच विविध डिजिटल शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे अध्ययन करता येणार आहे.
      यावेळी राज सलगर यांनी विद्यार्थ्यांनी डिजिटल साधनांचा योग्य व विधायक वापर करावा. तुमच्यासाठी आम्ही नेहमीच मदतीला धावून येऊ. शाळेला लाभलेल्या सुविधांचा योग्य उपयोग करा, मन लावून शिका आणि जीवनात मोठे व्हा, असे आवाहन केले.धर्मराज गुंडे यांनी डिजिटल बोर्डाचा जास्तीत जास्त शैक्षणिक उपयोग करून विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन करावे. डिजिटल माध्यमांचा वापर अध्ययन अधिक सोपे, रंजक आणि परिणामकारक करण्यासाठी करावा, असे सांगितले.
            यावेळी सर्व प्रमुख अतिथींचा शाळेचे प्राचार्य रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्राचार्य रविंद्र चव्हाण व कमांडंट  अशोक कुमार मंचंदा यांनी फाउंडेशनच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनीही शिखर पहारिया फाउंडेशनने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या या मोलाच्या योगदानाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन वनिता नेवसे यांनी केले, तर अर्चना नागणे यांनी आभार प्रदर्शन केले.  


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages