आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त वंचित ,बेघर,निराधार यांना अन्नदान करण्यात आले
(कटूसत्य वृत्त):- सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त पूर्व मंगळवार पेठ सिद्धेश्वर बँके जवळ सोलापुरातील वंचित,बेघर,निराधार गरिब यांना चपाती, वांग्याची भाजी, पुलाव, आमटी, बुंदी लाडू अन्नदान करण्यात आले.
आस्था सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सोलापूरात कुठेही कधीही उपाशी राहू नये भुकेलेला अन्न देणे आणि भगवंतांच्या नामाचे स्मरण करणे या दोन्ही गोष्टींचा विचार करून सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाचा पण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने गेल्या दहा वर्षापासून अविरतपणे मोफत अन्नदान केले जाते अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही हे नित्य वाढतच असते तर सोलापूरात कुठेही कार्यक्रमांमध्ये अन्न शिल्लक राहिल्यास तर आस्था सामाजिक संस्थेशी संपर्क साधावे.
आस्था सामाजिक संस्था अन्नदाता बरोबर गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, शैक्षणिक साहित्य वाटप, क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबिर इत्यादी सामाजिक उपयोगी कार्यक्रम घेत असते.
यासाठी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे, वेदांत तालिकोटी, पिंटू कस्तुरे, सुरज छंचुरे, महेश नागणसुरे, परिश्रम घेत आहेत.


No comments:
Post a Comment