उमाबाई श्राविका विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे यांना दुधारे स्पोर्टस् फाऊंडेशनचा राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार
(कटूसत्य वृत्त):- आज दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन नाशिक व ग्लोबल ह्युमन रिसर्च अँड वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ शुभ मंगल कार्यालय बळी मंदिर आग्रा रोड पंचवटी नाशिक या ठिकाणी संपन्न झाला.
उमाबाई श्राविका विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
या पुरस्कारांचे स्वरूप फेटा, ब्लेझर, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र असे होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शिवाजी राजे जाधव ( लखोजीराजे जाधव यांचे 16 वे वंशज), श्री अण्णासाहेब पाटील ( अध्यक्ष कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक), श्री अशोक दुधारे( अध्यक्ष डी.एस.एफ नाशिक) श्री आनंद खरे ( उपाध्यक्ष डी.एस.एफ ,नाशिक) यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्राविका संस्थेचे सचिव यतीन शहा, विश्वस्त करण शहा,विश्वस्त, देवई शहा, माधव देशपांडे ( प्रिसिजन कंपनीचे व्यवस्थापक) संचालक अंजली शहा, डॉ.रोहिणी शहा, मार्गदर्शिका दिप्ती शहा, मुख्याध्यापिका आश्विनी पंडित, उपमुख्याध्यापिका माधवी खोत, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ,प्रशालेतील शिक्षक,शिक्षिका यांनी हार्दिक अभिनंदन केले


No comments:
Post a Comment