TET पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची युवा महासंघाची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 6, 2026

TET पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची युवा महासंघाची मागणी

 TET पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची युवा महासंघाची मागणी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET) प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI) च्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे फाडून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी युवा महासंघाचे चे केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम यांनी MAHA TET पेपरफुटी ही लाखो विद्यार्थी व बेरोजगार युवक-युवतींच्या भविष्याशी झालेली गंभीर प्रतारणा असल्याचे सांगत, या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

निवेदनाद्वारे पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय व वेळबद्ध चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांच्या नुकसानीची भरपाई आणि भविष्यात सुरक्षित व पारदर्शक परीक्षा व्यवस्था लागू करण्याची मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी  दिला.

यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष बालकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, अमित मंचले, अभिजित निकंबे, राधागोपाळ बंडी, विलास कमलापुरे यांच्यासह युवा महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages