सोलापूर महानगरपालिकेच्या सातही विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 6, 2026

सोलापूर महानगरपालिकेच्या सातही विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड

 सोलापूर महानगरपालिकेच्या सातही विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या सात विषय समिती सभापतीपदासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या अनुषंगाने महानगरपालिका कौन्सिल हॉल येथे निवड प्रक्रिया पार पडली. प्रत्येक समितीसाठी एकमेव वैध अर्ज प्राप्त झाल्याने अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश  निऱ्हाळी यांनी सातही विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.बिनविरोध निवड झालेले सभापती पुढीलप्रमाणे आहेत –
स्थापत्य समिती सभापती – विजया चीप्पा
विधी समिती सभापती – सत्यजित वाघमोडे
वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापती – सुनील खटके
शहर सुधारणा समिती सभापती – स्वाती बडगु
मंडई व उद्यान समिती सभापती – राजशेखर पाटील
कामगार व समाजकल्याण समिती सभापती – श्रद्धा पवार
महिला व बालकल्याण समिती सभापती – निर्मला जंगम यांची निवड जाहीर झाल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी नवनिर्वाचित सातही सभापतींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेविका सौ. रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम तसेच अन्य पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांमार्फत शहराच्या विकासाला गती देत नागरिकाभिमुख कामकाज प्रभावीपणे राबविण्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages