आयआयटी मुंबईच्या राष्ट्रीय उद्योजकता स्पर्धेत एनबीएन सिंहगडची कामगिरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 6, 2026

आयआयटी मुंबईच्या राष्ट्रीय उद्योजकता स्पर्धेत एनबीएन सिंहगडची कामगिरी

 आयआयटी मुंबईच्या राष्ट्रीय उद्योजकता स्पर्धेत एनबीएन सिंहगडची कामगिरी



 



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने देशातील प्रतिष्ठित नॅशनल आंत्रप्रेन्युअरशिप चॅलेंज (NEC-2025) स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ही स्पर्धा आयआयटी बॉम्बेच्या 21 व्या ई-समिट अंतर्गत आयोजित करण्यात आली होती.

आशियातील सर्वात मोठ्या उद्योजकता संमेलनांपैकी एक म्हणून तिची ओळख आहे.
देशभरातील नामांकित महाविद्यालयांच्या ई-सेल संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत एन. बी. नवले सिंहगड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले बिझनेस मॉडेल, नाविन्यपूर्ण कल्पना आणि विकास आराखडा तज्ज्ञ परीक्षकांसमोर प्रभावीपणे सादर केला. त्यानंतर संघाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती.

अंतिम फेरीत देशभरातील सर्वोत्तम संघ सहभागी झाले. या ई-समिटदरम्यान विद्यार्थ्यांना वेदांता समूहाचे संस्थापक अनिल अग्रवाल, boAt चे सह-संस्थापक अमन गुप्ता तसेच Titan Capital चे संस्थापक कुणाल बहल व रोहित बन्सल यांसारख्या उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले. तसेच २०० हून अधिक गुंतवणूकदार, उद्योगतज्ज्ञ आणि मार्गदर्शकांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, स्टार्टअप संस्कृती आणि उद्योजकता विकसित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे हे यशस्वी फलित असल्याचे मानले जात आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ शंकर नवले यांच्यासह प्रशासन, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी संघाचे अभिनंदन केले आहे. ई-सेल समन्वयक म्हणून प्रा. मल्लिकार्जुन सपली यांनी काम पाहिले. 

यात आदित्य रामराव सूर्यवंशी, मयूर अमर पुप्पल, सय्यद जैद मुद्दसिर, वैष्णवी दादासाहेब गायकवाड, दीक्षा जितेंद्र कांबळे, विष्णुदास राजेंद्र बुरला, ऋषिकेश श्रीशैल देगील, प्रणव विलास गायकवाड, आदित्य अरुण नागणे, भाग्यश्री उमाकांत कुलकर्णी, साकेत स्नेहल कांबळे, जीवनकुमार शिवकुमार तोलानुरे, प्रसन्ना प्रविण साठे, इरफान बंदेनवाज सक्करगे, सौम्या देविदास मदगुंडी, औदूत दत्तात्रय जाधव, अजिंक्य सचिन खरात, अभिषेक नागनाथ चव्हाण, अनाम सरफराज सय्यद, भैरवराज शिवाचलप्पा धन्नल्ली आणि जाकलेर झाकी अहमद फैज अहमद तसेच विराज विजय आवटे या विद्यार्थ्यांचा समावेश होता‌‌.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages