अकलूज येथे लोकमंगल पतसंस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

अकलूज येथे लोकमंगल पतसंस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप

 अकलूज येथे लोकमंगल पतसंस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप




अकलूज (कटूसत्य वृत्त):- लोकमंगलचे संस्थापक तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार लोकमंगल पतसंस्था, शाखा अकलूज यांच्या वतीने अकलूज येथील दत्तनगर (राऊत नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ली ते ७ वीतील गरजू व अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक नकातेसर यांनी प्रास्ताविक करून या उपक्रमाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पंढरपूर विभागाचे विभागीय अधिकारी दिगंबर जाधव, शाखाधिकारी जगदीश पाटील, लोकमंगल पतसंस्थेचे कर्मचारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
लोकमंगल पतसंस्थेच्या या सामाजिक उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत मिळाली असून, त्यांच्या शिक्षणाला निश्चितच प्रेरणा व बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages