विठ्ठल नामाच्या गजरात एमआयटी व्हीजीएसमध्ये रंगला आषाढी सोहळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

विठ्ठल नामाच्या गजरात एमआयटी व्हीजीएसमध्ये रंगला आषाढी सोहळा

विठ्ठल नामाच्या गजरात एमआयटी व्हीजीएसमध्ये रंगला आषाढी सोहळा




बार्शी (कटूसत्य वृत्त):- श्रीमती प्रयाग कराड विश्वशांती इंग्लिश मीडियम हायस्कूल, बार्शी येथे आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, संस्कार आणि संतपरंपरेची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी समवेत पालखी पूजन करून करण्यात आली. बाल वारकऱ्यांचा शाळा परिसर व भगवंत मंदिरात 'ज्ञानोब- तुकाराम' आणि विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर कार्यक्रमात भक्तिगीते, भजन, अभंगगायन तसेच संतांच्या जीवनावरील आणि विठ्ठलभक्तीवरील कथा सादर करण्यात आल्या. संत गोरा कुंभार यांच्या विठ्ठलभक्तीवर आधारित समूहनृत्याद्वारे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलाविष्कार सादर केला.
 मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांना संतांच्या विचारांचे आचरण करण्याचा संदेश देत आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व विशद केले. विठ्ठल नामाच्या गजरात कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सांस्कृतिक विभाग तसेच विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages