नमस्ते दिनानिमित्त कचरा वेचक महिलांना केंद्र सरकारच्या नमस्ते योजनेअंतर्गत सुरक्षा साहित्य संचाचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

नमस्ते दिनानिमित्त कचरा वेचक महिलांना केंद्र सरकारच्या नमस्ते योजनेअंतर्गत सुरक्षा साहित्य संचाचे वाटप

 नमस्ते दिनानिमित्त कचरा वेचक महिलांना केंद्र सरकारच्या नमस्ते योजनेअंतर्गत सुरक्षा साहित्य संचाचे वाटप



   १४ जुलै हा नमस्ते दिन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाचा नमस्ते योजनेअंतर्गत सुरक्षा साहित्य संचाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्ता विना पवार,स्थायी समितीचे सभापती विजय चिप्पा,नगरसेविका श्रीदेवी फुलारी, नगरसेवक शंकर चौगुले, सार्वजनिक आरोग्य अभियंता चौबे, उपअभियंता पेंटर सफाई अधीक्षक सूर्यकांत लोखंडे, सफाई अधीक्षक( वाहन ) वासुदेव नरिमेटला, लेखक किशोर जाधव सावित्री महिला संघटनेच्या शकुंतला सूर्यवंशी, जयंती कदम,सुमित्रा देशमुख, परिसर भगिनी विकास संघ संस्थेच्या प्रमिला जाधव, बाळासाहेब रणदिवे, हेमा मैलारी, वर्षा गट्टू, वैभव कसबे पूजा सुरवसे आदींचे प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी परिसर भगिनी विकास संघ संस्थेच्या सोलापूर येथील कार्यकर्त्या प्रमिला जाधव यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की, " कचरा वेचक महिला या रोज सकाळी कचरा वेचण्यासाठी घराबाहेर पडतात . ऊन,वारा,पाऊस याची तमा न बाळगता आपले काम दुपारपर्यंत संपवून पुन्हा संध्याकाळी हॉटेल अथवा केटरिंग मध्ये त्या कामास जातात. त्यांचा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सुरू असलेला हा संघर्ष अतुलनीय आहे. आता नमस्ते योजनेअंतर्गत विविध व्यवसाय करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत. त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळण्यासाठी आयुष्यमान कार्ड देखील त्यांना या योजनेतून मिळणार आहे. यामुळे या महिलांचे कष्ट कमी होणार आहेत. "
   नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सांगितले की, " आपणास मिळत असलेले सुरक्षा साहित्य आपण वापरावे. केंद्र सरकारची कचरा वेचक आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठीची नमस्ते योजना खूप लाभदायक आहे. या योजनेपासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत."
   अतिरिक्त आयुक्ता विना पवार यांनी सांगितले की, " परिसर भगिनी समाज सेवा संस्थेच्या वतीने सोलापूर शहरात कचरा वेचकांचा केंद्राच्या नमस्ते योजनेसाठी सर्वे करण्यात आला. या सर्वे मध्ये ८३० कचरा वेचकांची आतापर्यंत नोंदणी झाली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात २९३ कचरा वेचकांना सुरक्षा साहित्य चे वाटप करण्यात येत आहे. कचरा वेचक महिलांनी आपल्या मुलांना शिक्षण द्यावे. त्यांना उत्तम संस्कार लावून सुजान नागरिक घडवण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. "
   स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा यांनी सांगितले की, " कचरा वेचक महिला या सोलापूर शहरातील उघड्यावर पडलेला कचरा उचलतात त्यामुळे पावसाळ्यात ड्रेनेज तुंबत नाहीत. एक प्रकारे त्या सोलापूर महानगरपालिकेचे काम करतात. त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. "
   यावेळी नगरसेवक शंकर चौगुले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर सोलापूर शहरातील असंघटित कचरा वेचकांना नमस्ते योजना प्राप्त व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या एडवोकेट सरिता मोकाशी यांनी अमेरिकेवरून पाठवलेला संदेश शकुंतला सूर्यवंशी यांनी वाचून दाखवला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मारम्मा कुमार , संगीता भंडारे, आशा बुगले, सोनाबाई बजारे, लक्ष्मीबाई भंडारे, नरसम्मा भोजे या कचरा वेचक महिलांना आणि भाग्यम्मा भूमपागा,गणेश गायकवाड,रामचंद्र चिनकेरी,अविनाश कांबळे,जेटप्पा कटके या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य संचाचे आणि आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. त्यानंतर २९३ कचरा वेचकांना सुरक्षा साहित्याचे वाटप परिसर भगिनी समाज सेवा संघ संस्थेच्या कार्यकर्त्या आणि सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर जाधव यांनी केले तर आभार हेमा मैलारी यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages