सोलापूर जिल्ह्यातील '१०८'च्या 60 रुग्णवाहिका देणार सेवा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

सोलापूर जिल्ह्यातील '१०८'च्या 60 रुग्णवाहिका देणार सेवा

 सोलापूर जिल्ह्यातील '१०८'च्या 60 रुग्णवाहिका देणार सेवा

मानाच्या दहा पालख्यांतील भाविकांना  वैद्यकीय मदतीसाठी खास अँप ची निर्मिती.. जिल्हा व्यवस्थापक डॉ. अनिल काळे यांची माहिती


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- आषाढीवारी साठी पालखी सोहळ्यासोबत पायी चालत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी शासनाचा १०८ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभाग व राज्य आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे यंदा वारीसाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा उभारली आहे. यावर्षी प्रथमच १० मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत ६० पेक्षा अधिक रुग्णवाहिका सज्ज असल्याची माहिती सोलापूर जिल्हा व्यवस्थापक डॉ. अनिल काळे यांनी दिली


रुकमाई सभागृह पोलीस संकुल, पंढरपूर येथे 'समारिटन' मोबाईल ॲप तसेच कार्डिओपल्मोनरी रिसक्स‍िटेशन (सीपीआर) या बाबतचे प्रशिक्षण पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

        यंदा आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रुग्णवाहिकेत एक डॉक्टर व चालक सज्ज राहणार असून, त्यांच्याजवळ अत्यावश्यक औषधाचा मुबलक साठा उपलब्ध राहणार आहे जिल्हा सोलापूर (जगदगुरु संत तुकाराम महाराज), जिल्हा सोलापूर (संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज), जिल्हा सोलापूर (संत श्री सोपानकाका महाराज) आणि इतर सात मानाच्या पालख्यांबरोबर १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
काही रुग्णवाहिका कार्डियाक (हृदयविकार ग्रस्तांसाठी) सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांचा यात समावेश आहे.

 'समारिटन' हे ॲप शासनाच्या आरोग्य विभाग आणि बी व्ही जी फौंडेशन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आले आहे. ॲपल स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून ते मोफत डाउनलोड करता येते. या ॲपमुळे केवळ रुग्णवाहिकेशी संपर्कच साधता येणार नाही, तर प्राथमिक उपचाराची माहितीही यामध्ये दिली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचण्यापूर्वी रुग्णाला काही आवश्यक मदत दिली जाऊ शकते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे व 108 चे मुख्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके, डॉ किशोर देव, यांच्या मार्गदर्शनाखली जिल्ह्यात वारकरी -भाविकांना पालखी मार्ग, तळांवर तसेच पंढरपूर शहरात आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याचेही 108 चे सोलापूर जिल्हा व्यस्थापक डॉ. अनिल काळे यांनी सांगितले.
       


यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे , डॉ.विजयकुमार सरडे, डॉ. महेश सूडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले,
प्रशिक्षक डॉ.वेदव्यास मोरे, डॉ कौस्तुभ घाटोळे, 108 चे अतिरिक्त व्यवस्थापक युवराज वाघ,सुनील चव्हाण , दिलीप शिंदे  तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी समारिटन ॲप


तसेच आरोग्य विभागाने यावर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत 'समारिटन' नावाचे मोबाइल ॲप्लिकेशन सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून वारकऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी त्वरित संपर्क साधता येणार आहे. ॲपवर आलेल्या माहितीवरून रुग्णवाहिका चालकाला रुग्णाचे ठिकाण अचूक कळणार. यामुळे वारीतील रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळून रुग्णाच्या जीवितास धोका कमी होण्यास मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages