स्वच्छ पंढरी ,सुंदर पंढरी व हरित पंढरी अभियान उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 31, 2026

स्वच्छ पंढरी ,सुंदर पंढरी व हरित पंढरी अभियान उत्साहात

 स्वच्छ पंढरी ,सुंदर पंढरी व हरित पंढरी अभियान उत्साहात 



 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय, सोलापूर यांच्यावतीने पंढरपुरात आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त स्वच्छ पंढरी, सुंदर पंढरी व हरित पंढरी अभियान उत्साहात राबविण्यात आले.
स्काऊट गाईड कार्यालय  सोलापूर, गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंढरपूर व नगरपरिषद पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभियानात विठ्ठल मंदिर व चंद्रभागा परिसरामध्ये स्वच्छता सेवा प्रकल्प राबविण्यात आला.
प्रारंभी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, पंढरपूरचे गटशिक्षणाधिकारी रणदिवे,जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट शंकर यादव, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड सुलक्षणा लोखंडे, जिल्हा आयुक्त प्रौढ संसाधन रशिद पठाण, जिल्हा संघटक स्काऊट श्रीधर मोरे, जिल्हा संघटक गाईड अनुसया सिरसाठ आदी मान्यवरांच्या हस्ते अभियानाचे उदघाटन करण्यात आले.
या अभियानात स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी वारकरी मार्गावर आठ हजार सीडबॉल तयार करुन त्यांचे योग्य ठिकाणी वितरण व रोपण करण्यात आले. श्री रामभाऊ जोशी हायस्कूलच्या बँण्ड पथकासह शहर जिल्ह्यातील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी पुतळा ,मंदिर परिसर , दगडी पुल, चंद्रभागा नदी परिसर आदी परिसरातून स्वच्छता रॅली काढून जनजागृती केले. रॅलीतून स्काऊटर-गाईडरने स्वच्छतेचे फलक,पर्यावरण, वृक्षसंवर्धन तसेच बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त परिसर आणि सामाजिक सेवेबाबत रॅलीद्वारे जनजागृती केले. यानंतर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी  मोठया प्रमाणात कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छ पंढरी,सुंदर पंढरी व हरित पंढरी हा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आले तसेच गाईड कॅप्टन तृप्ती खोबरे गाईडर यांनी हॅन्ड वॉश  बाबतची प्रात्यक्षिक  दाखविले.अभियान यशस्वी होण्यासाठी महेश भोसले, परमेश्वर चांदोडे,सोमेश्वर यंपे, बाळासाहेब शिंगाडे, समाधान बेद्रे,योगेश उपळकर,अशपाक मुजावर,महादेव पुजारी, महेश कोरे,प्रमोद जाधव,कुलश घागरे, समर्थ कुंभार, वैभव जाधवर, माने, रेशमा नामदे, रोकडे ,तृप्ती खोबरे, चंदनशिवे,नागनाथ घाटुळे, जाधव, खपाले,अमोल चंदनशिवे, दगडे, सोमनाथ देवकते,प्रशांत रायचुरे, हौदे, मधुरा गुळवे, वैष्णवी सगट व कार्यालयीन कर्मचारी आदींनी  परिश्रम घेतले. 

 *चौकट* 
 *या शाळेने घेतला सहभाग* 
या अभियानात श्री मल्लिकार्जुन हायस्कूल सोलापूर, श्री. दिगंबर जैन गुरुकूल प्रशाला सोलापूर, माध्यमिक प्रशाला वडवळ, जि.प.प्रा.शाळा, बार्डी, राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला मोहोळ,विवेक वर्धिनी विदयालय पंढरपूर,श्रीम. माताजी निर्मलादेवी विदयालय पंढरपूर,श्री.स्वामी समर्थ प्रशाला अरळी, रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब, न्युं इंग्लिश स्कूल करकंब, श्री.दुर्गा शिशु विहार प्राथ शाळा इसबावी, कर्मवीर विदयालय चारे, महाराष्ट्र विदयालय बार्शी, आर्या पब्लिक स्कूल पिपंळनेर, श्री. गगनगिरी विदयालय सांगवी, श्री. दत्त विदया मंदिर सुस्ते,लोटस इंग्लिश स्कूल, कासेगाव, सांगोला विदयामंदिर सांगोला, न्यु इंग्लिश स्कूल, गादेगाव, जि.प.प्रा.शाळा शेटे वस्ती क्र.१ व रोव्हर रेंजर ट्रुप आदी शाळेतील ८५२ स्काऊट गाईड व ९२ स्काऊटर गाईडर या अभियानात सहभाग घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages