रोटरी क्लब टेंभुर्णीच्या अध्यक्षपदी पपेश पाटील तर सचिवपदी बाळासाहेब सपाटे; पदग्रहण समारंभ संपन्न. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 30, 2026

रोटरी क्लब टेंभुर्णीच्या अध्यक्षपदी पपेश पाटील तर सचिवपदी बाळासाहेब सपाटे; पदग्रहण समारंभ संपन्न.

 रोटरी क्लब टेंभुर्णीच्या अध्यक्षपदी पपेश पाटील तर सचिवपदी बाळासाहेब सपाटे; पदग्रहण समारंभ  संपन्न




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-  रोटरी क्लब ऑफ टेंभुर्णीच्या रोटरी वर्ष २०२६-२७ साठी अध्यक्षपदी रुपेश पाटील तर सचिवपदी बाळासाहेब सपाटे यांनी पदभार स्वीकारला. मावळते अध्यक्ष दीपक व्यवहारे व सचिव संतोष तांबडे तसेच संदीप मोकाशी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडे पदभार सुपूर्द केला.

दरवर्षी दिमाखदार पद्धतीने होणारा रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ यावर्षी अत्यंत साधेपणाने पार पडला. रोटरी क्लबचे क्रियाशील संस्थापक सदस्य कै. अनिल बाबर यांच्या नुकत्याच झालेल्या दुःखद निधनामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी नूतन अध्यक्ष पपेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कै. अनिल बाबर यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लबतर्फे टेंभुर्णी शहरासाठी कायमस्वरूपी उपयुक्त ठरेल असा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे गव्हर्नर जयेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर रक्तदान शिबिरे, स्वच्छ टेंभुर्णी–सुंदर टेंभुर्णी, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, बेटी बचाव व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट गव्हर्नर रवी सुरवसे, रोटरीचे संस्थापक यशवंत हांडे, असिस्टंट गव्हर्नर महेश कोठारी, माजी अध्यक्ष वैभव गांधी, नागेश कल्याणी, संदीप जाधव, शब्बीर जहागीरदार, श्रीकांत लोंढे, मुकुंद अटकळे, रणजित बोत्रे, प्रशांत गांधी, सुदाम मस्के उपस्थित होते.

यावेळी रोटरी सदस्य सुजित बेलपत्रे, विठ्ठल मिस्कीन, सचिन होदाडे, उमेश रावळ, गणेश सोनीग्रा, श्री. अभय कोठारी, अविनाश देशमुख, संदीप मांजरे, तन्वीर मुलानी, प्रदीपकुमार माढा, शिराज तांबोळी, किशोर सलगर सागर क्षीरसागर यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मोकाशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव बाळासाहेब सपाटे यांनी केले. कार्यक्रमास रोटरी सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages