राजेंद्र गुंड यांचा आदर्श विद्यार्थी-शिक्षक ते आदर्श पत्रकार यशस्वी प्रवास -मुख्याध्यापक शिवाजी तळेकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 31, 2026

राजेंद्र गुंड यांचा आदर्श विद्यार्थी-शिक्षक ते आदर्श पत्रकार यशस्वी प्रवास -मुख्याध्यापक शिवाजी तळेकर

 राजेंद्र गुंड यांचा आदर्श विद्यार्थी-शिक्षक ते आदर्श पत्रकार यशस्वी प्रवास -मुख्याध्यापक शिवाजी तळेकर




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील शासकीय अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीचे सुपुत्र राजेंद्रकुमार बाळू गुंड यांचा रयत शिक्षण संस्थेच्या माढा महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार,विविध सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य शिक्षक कृती समिती व शैक्षणिक संस्थांच्या वतीने तालुका व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा व दैनिक पुण्यनगरी समूहाचा जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मान झाल्याने त्यांचा प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी जोरावर यशस्वी प्रवास झाल्याचे प्रतिपादन मोहोळ तालुक्यातील देवडीचे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक शिवाजी तळेकर यांनी केले आहे.

यावेळी दैनिक पुण्यनगरी समूहाचा जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र गुंड सर व त्यांच्या पत्नी सौ.मेघना गुंड यांचा सत्कार देवडीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी तळेकर व सौ. जलवंती तळेकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन करण्यात आला.

पुढे मुख्याध्यापक शिवाजी तळेकर यांनी सांगितले की, क्षेत्र कोणतेही असो प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा विविध संस्था,संघटना व समाजाकडून वेळोवेळी सन्मान होतो.राजेंद्र गुंड सर यांना आदर्श विद्यार्थी,आदर्श शिक्षक व आदर्श पत्रकार हे पुरस्कार तर मिळाले आहेतच परंतु ते एक आदर्श पालक सुद्धा आहेत.त्यांचा मुलगा राजवर्धन गुंड हा शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर सोलापूर येथे अश्विनी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे उच्च शिक्षण घेत आहे.मुलगी मेघश्री गुंड हिने शैक्षणिक गुणवत्ता,क्रिडा,सांस्कृतिक व बुद्धीबळ क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.ही बाब निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.

यावेळी विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, शांताबाई गुंड,जलवंती तळेकर,मेघना गुंड,मेघश्री गुंड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages