करमाळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १० किलो गांजासह साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 31, 2026

करमाळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १० किलो गांजासह साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

 करमाळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १० किलो गांजासह साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त




करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठे यश मिळवत १० किलो १०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत गांजासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पजेरो स्पोर्ट कार असा एकूण १० लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पांगरे परिसरात सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान संशयास्पद पजेरो स्पोर्ट कारची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये कारमध्ये पाच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलेला १० किलो १०० ग्रॅम गांजा आढळून आला.
या प्रकरणी पोलिसांनी रोहित शिवाजी केचे (वय २४, रा. गारअकोले, ता. माढा, जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत २ लाख ५२ हजार ५०० रुपये, तर पजेरो स्पोर्ट कारची किंमत ८ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे करीत आहेत. करमाळा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages