नेताजी शाळेतील मुले अनुभवले कुंभार कला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 8, 2026

नेताजी शाळेतील मुले अनुभवले कुंभार कला

 नेताजी शाळेतील मुले अनुभवले कुंभार कला




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीच्या वर्गातील १४५ विद्यार्थ्यांनी क्षेत्र भेटीच्या माध्यमातून कुंभार कला अनुभवले.
          यंदाच्या वर्षापासून राज्य शासनाच्या इयत्ता तिसरीचे पाठ्यपुस्तक बदललेला असून नवीन अभ्यासक्रमानुसार आपल्या सभोवतालचे जग या पाठ्यपुस्तकात एक मातीच्या वस्तू बनवण्याची कार्यशाळा यासंबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या पाठाला अनुसरून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा या हेतूने मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली, निलम नगर येथील नागनाथ कुंभार यांच्या कुंभार कामाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी कुंभार व्यवसायात चाकावर मातीपासून भांडी, मडकी, पणत्या, कुंड्या, मुर्त्या कशा तयार करतात. भट्टीत  वस्तू कशी गरम केली जाते. याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. त्यांच्या कष्टाची ही जाणीव निर्माण करुन देण्यात आली.तसेच कोटकंडी टेक्सटाइलला या टॉवेल कारखान्याला भेट देण्यात आली .या भेटीत विद्यार्थ्यांना सूत कसे तयार होते, मशीनवर टॉवेल कसा तयार केला जातो, त्यानंतर त्याची शिलाई होऊन तो कापड दुकानापर्यंत कसा पोहोचतो.याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.याद्वारे विद्यार्थ्यांनी कुंभार कला व कापड उद्योग या संबंधी अनुभव देण्यात आली.विद्यार्थी आनंदाने सहभाग घेतले.क्षेत्र भेट यशस्वी होण्यासाठी वर्गशिक्षक जगदेव गवसने, सुनिता आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages