नातेपुते येथील यश करिअर अकॅडमी च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील यश करिअर अकॅडमी च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले गरजू रुग्णांना जीवदान देण्यासाठी ५६ तरुणांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले. ज्ञानदीप ब्लड बँकेचे डॉक्टर व कर्मचारी यांनी रक्त संकलन करून घेतले. या कार्यक्रमासाठी नातेपुते नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष अतुल पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऋतुजा मोरे, माजी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, नगरसेवक बी. वाय. राऊत, नातेपुते पोलीस ठाण्याच्या पोसई सोनल मोरे रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी लक्ष करिअर अकॅडमीचे मेजर अनिल माने बोलत असताना म्हणाले की, रक्तदान हे सर्वात मोठे दान मानले जाते कारण तुमच्या रक्ताच्या एका थेंबाने एखाद्या मरणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात अपघात, प्रसूती किंवा शस्त्रक्रियेच्या वेळी रक्ताची नितांत गरज असते. रक्तदान केल्याने केवळ इतरांना जीवनदान मिळत नाही, तर रक्तदात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे होत असल्याचे मत माने यांनी व्यक्त केले या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर व तरुण उपस्थित होते.
No comments:
Post a Comment