जॅक कंपनीच्या वर्धापनदिनानिमित्त अत्याधुनिक शिवणयंत्रांचे अनावरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 8, 2026

जॅक कंपनीच्या वर्धापनदिनानिमित्त अत्याधुनिक शिवणयंत्रांचे अनावरण

जॅक कंपनीच्या वर्धापनदिनानिमित्त अत्याधुनिक शिवणयंत्रांचे अनावरण




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जगातील सर्वात मोठी शिवणयंत्र उत्पादक कंपनी Jack च्या ३० व्या वर्धापनदिनानिमित्त एमआयडीसी, सोलापूर येथील अनंतारा बँक्वेट येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी कंपनीने A5E-B, AMH-B C7, C7 Urus तसेच इतर अनेक अत्याधुनिक AI (Artificial Intelligence) आणि ड्युअल-कोअर तंत्रज्ञानावर आधारित नवीन शिवणयंत्रांची भव्य लॉन्चिंग केली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे (Chief Guest) म्हणून *सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (SGMA) चे अध्यक्ष सतीश पवार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नवीन तंत्रज्ञानावर आधारित मशिनरीचे अनावरण करण्यात आले. आपल्या मनोगतात पवार यांनी सोलापूरमधील वस्त्रउद्योगाला जागतिक स्तरावरील आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याची गरज अधोरेखित केली आणि अशा अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे उत्पादन क्षमता, गुणवत्ता व स्पर्धात्मकता मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमामध्ये जॅक कंपनीचे पश्चिम विभाग प्रमुख अतुल पांडे यांनी विविध मशिन्सचे थेट प्रात्यक्षिक (Live Demonstration) सादर करत त्यामागील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, AMH-B C7 हे मॉडेल 'Vigorous' Dual-Core Processor आणि 'Octopus' Nine-Brain AI Chip या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून कोणत्याही प्रकारच्या कापडावर उच्च दर्जाचे, वेगवान व अचूक शिवणकाम करण्यास सक्षम आहे. तसेच 'Smart Rhino' Feeding System सारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन प्रक्रियेत अधिक वेग, अचूकता व सातत्य प्राप्त होते. सोलापूरच्या गारमेंट उद्योगाच्या भविष्यासाठी ही अत्याधुनिक मशिनरी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी Jack कंपनी आणि सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (SGMA) यांच्यात भविष्यातील सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण सामंजस्य (Tie-up) करण्यात आले. या सहकार्यांतर्गत सोलापूरमध्ये "फ्युचर सॅम्पल फॅक्टरी" (Future Sample Factory) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या केंद्रामध्ये अत्याधुनिक AI आधारित शिवणयंत्रे, ऑटोमेशन व रोबोटिक सिस्टिम्सची स्थापना करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून उत्पादन कार्यक्षमता (Production Efficiency), गुणवत्ता, उत्पादनाचा वेग आणि जागतिक स्पर्धात्मकता मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे. तसेच सोलापूरच्या वस्त्रउद्योगाच्या आधुनिकीकरणाला चालना मिळून उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages