वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा- आरोग्यमंत्री आबिटकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 6, 2026

वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा- आरोग्यमंत्री आबिटकर

 वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा- आरोग्यमंत्री आबिटकर



 

        पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी भाविक येत असतात. पालखी मार्गावर तसेच आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीतून वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी सुसज्ज रुग्णवाहिकाबाईक ॲम्बुलन्सचा वापर करण्यात येतो. यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

 

       आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना पालखी मार्ग व तळांवर देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार समाधान आवताडेआमदार राजू खरे, ऑनलाईनव्दारे आमदार अभिजीत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैननगराध्यक्षा प्रणिता भालकेपंचायत समिती सभापती शुभम आगवणेअपर जिल्हाधिकारी गणेश नि-हाळीकार्यकारी अभियंता अमित निमकरराष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आयुक्त संजय काटकरजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाडमुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षकतालुका आरोग्य अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

          यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेवारकरी वारीसाठी घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी पोहोचेपर्यंत आरोग्याच्या सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. त्या नियोजनाप्रमाणे सर्व सेवा पुरवाव्यात. वारी कालावधीत भाविकांना डिजिटल आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. ‘आरोग्य संपन्न वारी’ व ‘वारी सहाय्य’ या माध्यमातून पालखी मार्गावर वारकरी भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असूनयामध्ये प्रत्येक आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्यामार्फत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

         “वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा पुरवताना कोणतीही उणीव राहू नये. वारी कालावधीत आरोग्य सुविधा देण्यासाठी पंढरपूर येथील स्थानिक डॉक्टरांची उपलब्धता राहण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना सूचना द्याव्यात. पालखी मार्गावरील तसेच शहरातील खासगी वैद्यकीय रुग्णालयांतील दहा टक्के खाटा आरक्षित करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

 

          पालखी मार्गावर वारकरीभाविकांसाठी ४३ ठिकाणी सुसज्ज आयसीयूची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच प्राथमिक उपचारांसाठी १५६ ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ वारकरी भक्तांसाठी उभारण्यात येणार आहेत. २१५ फिरते आरोग्य दूत नेमण्यात येणार आहेत. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये १६ ठिकाणी सुसज्ज आयसीयू कक्ष व १७ ठिकाणी तात्पुरते ‘आपला दवाखाना’ सुरू राहणार आहेतअशी माहिती श्री. आबिटकर यांनी दिली.

 

            पालखी मार्गावर एकूण ३५३ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दिंडी प्रमुखांना प्राथमिक औषधोपचार किटचे वाटप करण्यात येणार आहे. वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ३ हजार ८७ वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी तसेच फिरते मनुष्यबळ उपलब्ध राहणार आहे. त्याचबरोबर ३०२ विशेष तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे.

 

          पंढरपूर येथे वारकरी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता तीन दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. वारीत वारकऱ्यांची सेवा करणे हे भाग्याचे आहे. सर्वांनी पांडुरंगाच्या सेवेचा भाग म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

              यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर जिल्हा रुग्णालयातील २०० बेडच्या हॉस्पिटलसाठी आवश्यक ती कार्यवाही करून हॉस्पिटल सर्व सुविधायुक्त कार्यान्वित करावेअशी सूचना केली. वारी कालावधीत शहरात आयसीयू सेंटरची संख्या वाढवावीअसेही त्यांनी सांगितले. आमदार राजू खरे यांनी पालखी मार्गावरील सुविधा व उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा व स्वच्छता कायम ठेवावीअसे सांगितले. आमदार अभिजीत पाटील यांनी वारी कालावधीत ६५ एकर परिसरात वारकरी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करावेअशी मागणी केली. नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी वारी संपल्यानंतर संसर्गजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असल्याने आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवाव्यातअसे सांगितले.

 

        यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी पीपीटीद्वारे वारी कालावधीत वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.

 

 

*पंढरपूर उप जिल्हा रुग्णालयाला आरोग्यमंत्र्यांची भेट-

            आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपजिल्हा रुग्णालयपंढरपूर येथे भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. व रुग्णालयाची स्वच्छता पाहिली. तसेच रुग्णांशीही संवाद साधून त्यांना मिळत असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती घेतली. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages