पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये 'कारगिल विजय दिवस' उत्साहात साजरा
पुणे (कटूसत्य वृत्त):- :- पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या प्राचार्या स्मिता लोंढे यांच्या हस्ते शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून तसेच अमर ज्योत प्रज्वलित करून करण्यात आली. शहीद जवानांना यावेळी मानवंदना देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, प्रेरणादायी सादरीकरणे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. चलवादी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी कारगिल युद्धातील अमर जवानांच्या शौर्याला अभिवादन करत त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड.रेणुका चलवादी, ॲडमिनिस्ट्रेटर सायली शिंदे, उपप्राचार्या ज्योती सचदेव, जयश्री कदम (सीबीएसई विभाग), बीना कदम आणि अश्विनी मोहिते (एसएससी विभाग) यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात २५ विद्यार्थ्यांची कमांडर म्हणून निवड करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना बॅच लावून सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त आणि देशसेवेची प्रेरणा निर्माण झाली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन नम्रता शिंदे आणि नईमा शेख यांनी केले. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत शहीद जवानांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
*गुरूपौणिमा उत्साहात साजरी*
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे गुरुंचे महत्त्व अधोरेखित केले. 'गुरु-शिष्य' या नाटकातून गुरु द्रोणाचार्य व एकलव्य यांच्या नात्याचे प्रभावी सादरीकरण करत गुरूचे स्थान सर्वोच्च असल्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी नाटकातून संदेश देऊन गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्राचार्या स्मिता लोंढे व संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड. रेणुका चलवादी यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला. संस्थेचे अध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास व्यवस्थापिका सायली शिंदे, ज्योती सचदेव, जयश्री कदम, बीना कदम, अश्विनी मोहिते तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कशीष बाराथे यांनी केले.


No comments:
Post a Comment