"वांगचुक यांच्या उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 14, 2026

"वांगचुक यांच्या उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष?

 "वांगचुक यांच्या उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष?

१५ दिवसांपासून जंतर-मंतरवर संघर्ष; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र"





नवी दिल्ली (वृत्त सेवा):- लडाखचे सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला १५ दिवस पूर्ण झाले असून, जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या त्यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून वजनात सुमारे दहा किलोची घट झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे देशभरातील समर्थक आणि हितचिंतकांमध्ये चिंता वाढली आहे. वांगचुक यांचे उपोषण हे कोणत्याही राजकीय किंवा व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा व विद्यार्थ्यांवर उपकार करावेत ही त्यांची मुख्य मागणी आहे. प्रधान यांचा राजीनामा का हवा आहे? वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत (NEET) घोटाळा झाला. 'नीट' परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे सरकारची नाचक्की झाली. प्रश्नपत्रिका वारंवार फुटल्याने जनक्षोभ वाढला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला ही परीक्षाच रद्द करावी लागली. परीक्षेच्या नव्या प्रश्नपत्रिका लष्कराच्या, हवाई दलाच्या ताब्यात देऊ व सुरक्षित ठेवू अशी भूमिका सरकारने घेतली. हे तर अतिच झाले. देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले गेले. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याला शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार असल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा ही देशातील तरुणांची मागणी आहे. ही मागणी सरकारने झिडकारली तेव्हा सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले. उपोषणाला 15 दिवस झाले तरी सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही. या काळात मोदी चार-पाच देश फिरून आले. एक-दोन 'पदके' नव्याने घेऊन दिल्लीत उतरले. अयोध्येच्या राम मंदिराची लूट याच काळात समोर आली. या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचे वांगचुक यांचे उपोषण आहे. वांगचुक हा हिमालयातील एक साधा, निःस्वार्थी कार्यकर्ता आहे. तो पर्यावरण राखण्यासाठी लढा देतो. तो नवे शैक्षणिक मॉडेल घेऊन हिमालयाच्या कुशीत काम करतो. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अमीर खान एक भव्य चित्रपट बनवतो. पंतप्रधान मोदी त्यांच्या कार्याचा 'मन की बात'मध्ये गौरव करतात. वांगचुक यांना 'पद्मश्री' देऊन सन्मानित केले जाते, पण तेच वांगचुक लेह-लडाखच्या जनतेच्या हक्कासाठी सरकारला धारेवर धरतात तेव्हा वांगचुक यांचे भय सरकारला वाटू लागते. वांगचुक यांनी लडाखमधील चीनच्या घुसखोरीचा मुद्दा लावून धरला. चिनी ड्रॅगन लडाख गिळत असल्याचे जगाला ओरडून सांगितले तेव्हा मोदी सरकारने वांगचुक यांना बेकायदेशीरपणे अटक केली. त्यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात डांबले. धर्मेंद्र प्रधान हे काय शिक्षण क्षेत्रातले महान व्यक्तिमत्त्व नाही. ते काही डॉ. राधाकृष्णन, मौलाना आझाद, नरसिंह राव किंवा अर्जुन सिंग यांच्याप्रमाणे शिक्षण खात्याला दिशा देणारे नेतृत्व नाही. त्यांच्या काळात अनेक विद्यापीठांत भ्रष्ट कुलगुरू नेमले व त्यांनी शैक्षणिक संस्थांचे वाटोळे केले. राष्ट्रीय परीक्षांचा आमदार-खासदारांप्रमाणे घोडे बाजार भरला. लाखो रुपये देऊन प्रश्नपत्रिका बाजारात विकत मिळू लागल्या व त्यावर आवाज उठवणाऱ्यांवर प्रधान यांनी लाखोली वाहिली. 

वांगचुक यांनी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) संदर्भातील कथित गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान आणि त्याबाबत नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी केली आहे. त्यांच्या मते, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून या प्रकरणाची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे.

वांगचुक यांचे समर्थक म्हणतात की, हे आंदोलन कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. मात्र, उपोषणाला पंधरा दिवस उलटूनही केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सोनम वांगचुक हे लडाखमधील पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि पर्यायी शिक्षण पद्धतीसाठी कार्य करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असून त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कार्यावर आधारित प्रेरणादायी चित्रपटही तयार करण्यात आला होता.

दरम्यान, वांगचुक यांनी यापूर्वी लडाखमधील पर्यावरण, स्थानिकांच्या हक्कांचे प्रश्न तसेच सीमावर्ती भागातील विविध मुद्द्यांवरही भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांना प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याचाही उल्लेख त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

विरोधकांचा आरोप आहे की, केंद्र सरकार आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पूर्वी अण्णा हजारे यांच्या आंदोलनादरम्यान तत्कालीन केंद्र सरकारने चर्चेचा मार्ग स्वीकारला होता, तर आता संवादाऐवजी मौन बाळगले जात असल्याची टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन केले आहे. वांगचुक यांच्या प्रकृतीची गंभीर दखल घेऊन सरकारने तातडीने संवाद साधावा आणि तोडगा काढावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages