पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पालखी सोहळ्याच्या नियोजनाची पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पालखी सोहळ्याच्या नियोजनाची पाहणी

 पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पालखी सोहळ्याच्या नियोजनाची पाहणी



नातेपुते (कटूसत्य वृत्त):- रविवार दिनांक १९ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होत असून, त्या पार्श्वभूमीवर आज धर्मपुरी आणि नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील पालखी मुक्काम स्थळांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन यांनी पाहणी करून सर्व आवश्यक सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.वारकऱ्यांच्या निवासासाठी उभारण्यात आलेल्या जर्मन हँगरची पाहणी करत वारकरी बांधव तसेच पालखी सोहळ्याच्या प्रमुखांशी संवाद साधला. निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सेवा, सुरक्षा आणि इतर मूलभूत सुविधांची तपासणी करून वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी संबंधित सर्व विभागांना आवश्यक सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.
वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सुखकर व्हावा, तसेच विठुरायाच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा, या भावनेतून सर्व यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत असल्याचे मत ही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्या ठिकाणी व्यक्त केले.याप्रसंगी नातेपुते नगरपंचायत चे मुख्य अधिकारी विकास शिंगाडे अध संबंधित विभागांचे अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages