लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने पंढरपुरातील सर्व शासकीय कार्यालयात प्रतिमा भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने पंढरपुरातील सर्व शासकीय कार्यालयात प्रतिमा भेट

 लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने पंढरपुरातील सर्व शासकीय कार्यालयात प्रतिमा भेट



पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांच्या अचानक अपघाती निधनामुळे त्यांच्यासारख्य कर्तव्यदक्ष व वेळेचे महत्व पाळून इतरांना शिस्त लावण्याच्या पध्दतीमुळे दादा अनेकांच्या लक्षात राहतील मात्र राज्य शासनाने नुकतेच परिपत्रक काढले आहे की, दिनांक 22 जुलै या दिवशी लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती ही सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याबाबत परिपत्रक जारी केल्याने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व पंढरपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी आदरणीय अजितदादा यांचे सर्व शासकीय कार्यालय यांना फोटो भेट देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुहम्मद उस्ताद, युवक शहराध्यक्ष अमोल परबतरावं, जिल्हा सरचिटणीस सारंग महामुनी, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप तांदळे उपस्थित होते
यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे म्हणाले की, लोकनेते अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासामध्ये खूप मोलाचे योगदान दिलेले आहे. दादांनी उपमुख्यमंत्री व राज्याच्या विविध खात्यांचे मंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.  सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम दादांच्या नावावर आहे
विठुरायाची नगरी तिर्थक्षेत्र पंढरपूर शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजनेतून व विविध खात्यातून दादांनी निधी दिला. दादांच्या पंढरपूरच्या अनेक आठवणी आहेत त्यांच्या स्पष्ट वक्तपणामुळे व थेट भिडण्याच्या सवयीमुळे अजितदादा नेहमी आठवणीत राहतील. अजितदादांनी केलेले कार्य येणाऱ्या पिढीच्या लक्षात रहावे यासाठी  नुकताच राज्य शासनाने त्यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याबाबत आदेश काढलेला आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने पंढरपूर शहरातील व तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, प्रांतधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, रुक्मिणी हायस्कुल, महावितरण कार्यालय,शिरढोण ग्रामपंचायत कार्यलय,असे विविध शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालयात अजितदादांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आलेली आहे, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages