अनगरच्या केदार नकाते यांची अन्न व औषध प्रशासन विभागात इन्स्पेक्टरपदी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 25, 2026

अनगरच्या केदार नकाते यांची अन्न व औषध प्रशासन विभागात इन्स्पेक्टरपदी निवड

 अनगरच्या केदार नकाते यांची अन्न व औषध प्रशासन विभागात इन्स्पेक्टरपदी निवड




अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगर येथील श्रीअनगरसिध्द शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी केदार नकाते यांची अन्न व औषध प्रशासन विभागात इन्स्पेक्टर पदावर निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्रीअनगरसिध्द शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढोले यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व देऊन केदार नकाते यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना ढोले यांनी, "जिद्द, सातत्यपूर्ण परिश्रम आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या बळावर यश मिळते. केदार नकाते यांचे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे," असे सांगितले.
यावेळी प्राचार्य महादेव चोपडे, उपप्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके, आबासाहेब नकाते, परमेश्वर थिटे,रमेश चव्हाण,गोरख गायकवाड, सत्यवान दाढे, बब्रुवान बोडके, गजानन जिरगे, बापुराव घुले गणेश नकाते तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना केदार नकाते यांनी विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठबळामुळे हे यश मिळाल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न केल्यास कोणतेही यश अशक्य नसल्याचा विश्वास व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages