विठुरायाच्या पंढरीत आयुर्वेदिक उपचार पद्धतीने केल्या गेली आरोग्यदायी सेवा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ।। विठुरायाच्या चरणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव नतमस्तक होऊन सर्वांना चांगल आयुष्य ,आरोग्य लाभो आणि बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे... सर्वांना निरोगी आरोग्यदायी जिवन मिळु दे ... असं साकडं विठूराया चरणी घातलं.
आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी लाखो भाविक व वारकरी दिंडया श्री.क्षेत्र पंढरपूर येथे जाऊ विठूराया चरणी नतमस्तक होतात. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या भक्तीमय सोहळ्यासाठी राज्यातील काना कोपऱ्यातुन लाखो वारकरी विठ्ठल नगरीत विठ्ठला चरणी नतमस्तक होण्यासाठी एकवटतात. आषाढी एकादशी निमित्त केंद्रीय आयुष ( स्वतंत्र प्रभार )तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी श्री.पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेतले. देशातील प्रत्येक नागरिकांना चांगले निरोगी आयुष्य मिळूदे... अन्नधान्य पुरवणाऱ्या बळीराजासाठी दमदार पाऊस होऊ दे ...असे साकडेही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी विठुराया चरणी घातले.
बॉक्स
केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची विठूराया चरणी सलग 43 वी वारी ...
देशाचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे विठुरायाचे परमभक्त आहेत. कोरोनाचा दोन वर्षाचा कार्यकाळ सोडला तर गेल्या 43 वर्षापासून ते आषाढी एकादशीला नियमितपणे विठू चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असतात..प्रत्येक भारतीयांना निरोगी आयुष्य लाभु दे ... बळीराजाला सुखी ठेव ... चांगला पाऊस पडू दे .. असं साकड त्यांनी आपली 43 वी वारी पूर्ण करताना विठ्ठल चरणी घातलं ...
बॉक्स 2
विठुरायाच्या पंढरीत आयुर्वेदिक उपचार पद्धतीने केल्या जातेयं वारकऱ्यांची सेवा ..
आषाढी एकदशी निमित्य विठ्ठल रुखमार्ईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना आयुष सेवा सुविधा केद्रामार्फत पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीने आरोग्यदायी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या . यावर्षी
पंढरपुर येथील तिन रस्ता येथे महाआरोग्य शिबीर , चंद्रभागेच्यातिरी आरोग्य केंद्र वाळवंट आणि आरोग्य केंद्र 65 एक्कर या तिन ठिकाणावर ही केंद्र उभारण्यात आले आहे या आयुष सेवा सुविधा केंद्रावर वारकऱ्यांना आयुवैदीक , होमिओपॅथी औषध वाटप , योगाबाबत मार्गदर्शन , स्नेहन - स्वेदन (वाफ देणे ) वारकऱ्यांसाठी तेल - मसाज , विद्ध - कर्म , अग्नी - कर्म , चरण सेवा करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment