नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेचे वारकरी दिंडी उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.
प्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते श्री पांडुरंगाच्या प्रतिमेचे व पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकोबा च्या जयघोषात दिंडीने मार्गक्रमण सुरू केले. या भव्य दिंडीत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या ११४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान केले होते. विठ्ठलाच्या वेशभूषेत शिवराज घंटे तर रखुमाईच्या भूमिकेत प्रणिता ममदापुरे, संत ज्ञानेश्वरांच्या वेशभूषेत युवराज घंटे, संत तुकारामांच्या वेशभूषेत शाश्र्वत मठपती आदी विद्यार्थ्यांनी सजीव देखाव्यातील पोशाखात आकर्षित दिसत होते.
संगीत विभागाच्या स्वराली रॅका, पूर्वा रेके, वैष्णवी घंटे, रक्षिता सुंकनपल्ली, हेमा जुंजा, लहरीका गोने, प्रचिता श्रावण, गणेश चपळगाव, भरत गडगी, समर्थ आलदी, मल्लिकार्जुन खानापुरे आदी विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाची शाळा भरली, चंद्रभागेच्या तिरी, विठू माऊली तू माऊली जगाची, अबिर गुलाल, हरी ओम विठ्ठला आदी विविध प्रकारचे भक्तिगीते सादर केली.विद्यार्थिनींनी माऊली माऊली या गीतावर सादर केलेले नृत्य सादर केले.
हि दिंडी निलम नगर, सुनील नगर, विनायक नगर, माळी नगर आणि आशा नगर या परिसरातून काढण्यात आली. ठिकठिकाणी भक्तगण पालखीचे औक्षण करुन दर्शन घेत होते. भक्तगण ठिकठिकाणी पाणी व प्रसाद वाटप करुन दिंडीचे स्वागत केले. बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव..तुकाराम.. पंढरीनाथ महाराज की जय या जयघोषानी तसेच टाळ-मृदंगाचा निनादांनी परिसर दुमदुमून गेला होता. भगवे झेंडे धारी विद्यार्थ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला होता. शाळेच्या प्रांगणात पारंपरिक रिंगण, फुगडी, काटवटकणा यांसारख्या खेळांचे सादरीकरण करण्यात आले.
या दिंडीत महाराष्ट्र शासनाच्या 'नवभारत साक्षरता अभियान' अंतर्गत 'वारी साक्षरतेची' या उपक्रमाचाही जनजागृती करण्यात आली.
या भक्तिमय दिंडीत मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतले.

No comments:
Post a Comment