आषाढी वारीत आ. रोहित पवारांच्या पुढाकाराने एक लाख छत्र्यांचे वाटप - डॉ.योगेश रणदिवे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

आषाढी वारीत आ. रोहित पवारांच्या पुढाकाराने एक लाख छत्र्यांचे वाटप - डॉ.योगेश रणदिवे

 आषाढी वारीत आ. रोहित पवारांच्या पुढाकाराने एक लाख छत्र्यांचे वाटप - डॉ.योगेश रणदिवे






पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांसह यात्रेच्या बंदोबस्तासाठी दिवस-रात्र कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी, छोटे व्यावसायिक, दिव्यांग नागरिक, आरोग्य सेवक आणि परिचारिका यांना उन्हाचा तडाखा व पावसाच्या सरींपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर छत्र्यांचे वाटप करण्यात आले अशी माहिती डॉक्टर योगेश रणदिवे यांनी दिली.
आषाढी वारीत लाखो भाविकांच्या सेवेसाठी अनेक यंत्रणा अहोरात्र कार्यरत असतात. ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करण्या करता एक लाख छत्र्यांचे वाटप करण्यात आले समाजामध्ये  अशा प्रत्येक घटकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष उपयोगी पडेल अशी मदत करण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचे नियोजन डॉ. योगेश रणदिवे व शहराध्यक्ष दीपकदादा वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष अमरसिंह खांडेकर सर, आसिफ पटेल, दिनेश ममाने तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंढरपूर शहरातील विविध ठिकाणी जाऊन लाभार्थ्यांना छत्र्यांचे वाटप केले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages