जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचे वृक्षारोपण अभियान यशस्वीरित्या संपन्न!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज-नाणीज धाम यांच्या प्रेरणेने "एक भक्त एक वृक्ष" या पर्यावरण संरक्षणाच्या संकल्पातुन केवल 15 दिवसात दिनांक 5 जुलै ते 19 जुलैपर्यंत संपूर्ण भारत भर भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले होते.या आभियानाच्या माध्यमातुन सोलापूर शहर व जिल्ह्यांमध्ये बारा हजार पाचशे एक्काहत्तर (12571) इतके झाडे लावण्यात आली तर संपूर्ण भारत देशामध्ये सहा लाख आठरा हजार नऊ (618009) इतकी झाडे लावून एक मोठा विक्रम करण्यात आला.सोलापूर परिसरात बाळु मामा मंदिर बेलाटी. स्वामी नारायण गुरुकुल प्रशाळा कुंभारी. हिरज. मार्डी. पाथरी.बीबी दारफळ. नान्नज. विडी घरकुल आदि या ठिकाणी झाडे लावण्यात आली.या वेळी तेथील लोकप्रतिनिधी शिक्षक अधिमान्यवर उपस्थित होते. या अभियान दरम्यान शहर प्रमुख दिगंबर आवताडे महिला अध्यक्ष सौ. ऐश्वर्याताई उत्तरकर युवा प्रमुख विनायक कांबळे दादासाहेब नागटिळक बाळु कदम निखिल मठे विजय गाडे विशाल चव्हाण सुधाकर फंड मोहिते-बुवा तसेच संप्रदायातील भक्त-शिष्य आदिनी परिश्रम घेतले!


No comments:
Post a Comment