सुयश विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
बार्शी (कटूसत्य वृत्त):- सुयश विद्यालय, बार्शी येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी व सातवी) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी :
अनय काळे (284), गिरीश देवकर (268), अबूसुफियान आत्तार (264), साईराज पिंगळे (264), सोहम साखरे (262), सोहम स्वामी (262), आदर्श भास्कर (258), अनिश सालस्कर (258), अथर्व बांगर (258), ईश्वरी आगलावे (256), ऋतुराज राजे-निंबाळकर (256) व सार्थक शिरगिरे (256).
इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी :
विराज आवटे (280), रविराज पायगन (274), अर्णव आवाड (270), रिद्धेश देशमुख (266), ओवी माहुले (264), सक्षम डुमणे (264), आर्या बाशिंगे (262), स्वरूपा देव (260), विरेंद्रसिंह मोहिते (258), सत्यजित जाले (256), अद्वैत बोराडे (254) व वेदिका गुंड (254).
या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सुयश विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
.png)
No comments:
Post a Comment