सोलापुरात सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 21, 2026

सोलापुरात सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन

 सोलापुरात सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील सजग नागरिक यांच्या वतीने आज जिल्हा परिषद, पूनम गेट येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यासोबत झालेल्या कारवाईचा निषेध आणि त्यांनी मांडलेल्या मागण्यांच्या समर्थनार्थ एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, युवक, महिला तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान सहभागी नागरिकांनी शांततापूर्ण पद्धतीने घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. उपस्थित विध्यार्थी आणि नागरिकांनी लोकशाही मूल्यांचा सन्मान राखण्याची गरज व्यक्त करत नागरिकांचा आवाज ऐकला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न आणि सार्वजनिक धोरणांबाबत संवादाची आवश्यकता अधोरेखित केली. आंदोलनादरम्यान विविध नागरिकांनी आपला पाठिंबा नोंदवत सामाजिक प्रश्नांवर लोकशाही मार्गाने आवाज उठविण्याचे महत्त्व मांडले.

हे आंदोलन यशस्वी करण्याकरिता निलेश संगेपाग, निरंजन बोध्दूल, शेखर बंगाळे, मल्लिकार्जुन पिलगेरी, रोबर्ट गौडर, यांनी परिश्रम घेतले.

आंदोलनाची सांगता शांततेत करण्यात आली. सहभागी नागरिकांनी अशा जनहिताच्या विषयांवर भविष्यातही एकत्रितपणे लोकशाही मार्गाने भूमिका मांडण्याचा निर्धार व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages