सोनम वांगचुक यांच्या आंदोलनच्या समर्थनार्थ संभाजी ब्रिगेडचे मूक आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 21, 2026

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनच्या समर्थनार्थ संभाजी ब्रिगेडचे मूक आंदोलन

 सोनम वांगचुक यांच्या आंदोलनच्या समर्थनार्थ संभाजी ब्रिगेडचे मूक आंदोलन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीट (NEET), यूजी टीईटी सह विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम झाला असून अनेक विद्यार्थ्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागले आहे तर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केली आहे या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार व अनागोंदी थांबवावी आणि शिक्षण व्यवस्था वाचावी.  या न्याय मागण्यांसाठी सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या एकवीस दिवसांपासून बेमुदत उपोषण करीत आहेत दिल्ली पोलिसांनी दडपशाही करीत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला त्यांच्या निषेधार्थ व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे मा. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास  जिल्हा जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शेळके जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे जिल्हा कार्याध्यक्ष इशरद नागोरे जिल्हा संघटक प्रकाश डोंगरे  अनिता वाघमारे  शहर सचिव रमेश भंडारी जिल्हा संघटक दिलीप निंबाळकर बाळासाहेब वाघमारे अरविंद कांबळे प्रदीप वाघमारे आधी उपस्थित होते.
 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages