अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 22, 2026

अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

 अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम



पंढरपूर  (कटूसत्य वृत्त):- लोकनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या 68 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम हाती घेतला आहे. 22 जुलै 2026 या अजितदादांच्या जयंतीदिनी पंढरपूर शहरातील उपजिल्हा रूग्णालय व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 22 जुलै 2026 रोजी जन्मणाऱ्या 11 लहान मुलींच्या नावे प्रत्येकी 22 हजार रूपयांची ठेव अजितदादा सुकन्या योजना (ठेव रक्कम)  ठेवणार असून  ती त्यांच्या जयंती दिनी वेळेस ठेवल्यानंतर त्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस ती रक्कम काढता येणार आहे त्यामुळे त्या मुलींच्या कुटूंबियांना आर्थिक आधार मिळणार आहे. त्याचबरोबर लोकनेते अजितदादांचे सोलापूर जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे नाते होते त्यांच्या स्मृती जपण्यासाठी यावर्षीपासून प्रत्येक वर्षी सोलापूर जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका नेत्यास लोकनेता पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. अजितदादा सुकन्या योजनेमध्ये नाव नोंदविलेल्या मुलींच्या पालकांना त्याची पावती राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याहस्ते देण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी दिली.
सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष मुहम्मद उस्ताद , युवक शहराध्यक्ष अमोल परबतराव, सारंग महामुनी, प्रदीप तांदळे, माऊली कुंभार हे परिश्रम घेत आहेत.
अजितदादा पवार यांच्या कार्याचा आलेख महाराष्ट्राच्या राजकारणात सुवर्ण अक्षराने कोरलेला आहे. त्यांच्या आठवणी महाराष्ट्र अजूनही विसरलेला आहे. दादांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या  राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. अजितदादांच्या आठवणीत अजितदादा सुकन्या योजना राबविणार असून त्या माध्यमातून मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे, तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ या संकल्पनेला बळकटी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आठवणीत राहील असा समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचा हा प्रयत्न असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक संदेश समाजात जाईल, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages