ब्रह्मांड कट्टयावर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व अन्न भेसळ प्रात्यक्षिकसह कार्यक्रम संपन्न
ठाणे (कटूसत्य वृत्त):- ब्रह्मांड कट्टा सामाजिक-सांस्कृतिक मंडळ आयोजित ब्रह्मांड कट्टयावर रविवार दिनांक १९ जुलै २०२६ रोजी,स्वस्तिक पाल्म्स को.ऑ सो.च्या सभागृहात ब्रह्मांड वसाहतीतील व आसपासच्या परिसरातील १०वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर व पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते इयत्ता १०वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल,प्रमाणपत्र, वह्या , छत्रपती शिवाजीमहाराज वरील पुस्तक व मके ओव्हर डोनटस (MOD) चे गिफ्ट पाकीट देऊन सन्मानित करण्यात आले.
ब्रह्मांड परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांसोबत ब्रह्मांड कट्टा परिवारातील व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना देखील गौरविण्यात आले. अशा एकूण ४० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार डावखरे साहेब व आमदार माननीय श्री.संजय केळकर साहेब यांनी मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभाशिर्वाद दिले. तसेच हा स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल ब्रह्मांड कट्ट्याचे अभिनंदन केले.
सदरची पारितोषिके संतोष डोईफोडे(MOD), कै. नारायण अनंत कुलकर्णी व कु. ऐश्वर्या मांड्या यांच्या स्मरणार्थ देण्यात आली.
ब्रह्मांड कट्टा नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. त्या अनुषंगानेच श्री. गजानन पाटील, प्रोजेक्ट ऑफीस,ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई यांचा नागरिकांना सतर्क करणारा अन्नभेसळ कशी होते व कशी ओळखावी याचे प्रात्यक्षिक दाखविणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अन्न भेसळ कशी होते व कशी ओळखावी हे निरनिराळ्या उदाहरणाने दाखविले. चहा ,मिरचीची पूड , इ. पदार्थावर प्रात्यक्षिक करून दाखवले. यास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणी म्हणून टिस्का मिस अँड मिसेस ब्युटी पेजंट या नामांकित स्पर्धेची मिस इंडिया फर्स्ट रनर अप कु. अनुष्का अनिल राऊत उपस्थित होती. तिचे ब्रह्मांड कट्टयावर विशेष कौतुक करण्यात आले.
तसेच यावर्षी इयत्ता दहावी मधे शिकत असलेली ब्रह्मांड मधील कु.इशिता हेमंत गोफण हिने मिस मुंबई हा किताब मिळविल्याबद्दल मिस इंडिया अनुष्का हिच्या हस्ते ब्रह्मांड कट्ट्यावर गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली पाटील यांनी केले.
ब्रह्मांड कट्टयावर नेहमीच सांस्कृतिक व सामाजिक कार्याबद्दल व विशेष कामगिरीबद्दल स्थानिक गुणीजनांना प्रोत्साहन देऊन दर्जेदार कार्यक्रम आयोजित करण्याची ग्वाही संस्थापक श्री.राजेश जाधव यांनी दिली.
कार्यक्रमाची सांगता ब्रह्मांड कट्ट्याचे अध्यक्ष महेश जोशी यांनी आभार प्रदर्शनाने झाली.



No comments:
Post a Comment